पंढरपूर (प्रतिनिधी) - मराठी पाऊल पडते पुढे या मराठी चित्रपटाच्या टीमने शनिवार दिनांक २८ एप्रिल रोजी भक्त निवास येथे पत्रकारांशी संवाद साधला. निर्माता प्रकाश बाविस्कर म्हणाले,या सिनेमात मराठी उद्योजकाची थरारक संघर्ष गाथा प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे.
यावेळी या मराठी चित्रपटाचे निर्माता प्रकाश बाविस्कर, प्रमुख अभिनेता चिराग पाटील, प्रमुख नायिका सिध्दी पाटणे यांनी हा सिनेमा कसा वेगळा आहे हे सांगितले.
एक गावातील युवक मुंबई सारख्या महानगरात येऊन व्यवसाय सुरू करतो,पण प्रस्थापित व्यावसायिक मंडळी व राजकीय लोक कसा त्रास देतात, राजकीय मंडळी व अधिकारी यांची अभद्र युती नव उद्योजकांना कसा अडथळा निर्माण करतात व याविरोधात त्या युवकाने केलेला संघर्ष, त्याला साथ देणारी नायिका याची रोमहर्षक कहाणी दाखविण्यात आली आहे. हा चित्रपट शुक्रवार दि ५ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या सिनेमातून येणारी ६० टकके रक्कम वृद्धाश्रम, आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. केवळ १० टक्के नफा सिनेमातील कलाकारांना देण्यात येणार आहे.
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागारे, संजय क्षेमकल्याणी, प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.