मोहोळ (प्रतिनिधी) - दिनांक 21 ते 23 एप्रिल 2023 दरम्यान अमरावती येथे झालेल्या शालेय धनुर्विद्या स्पर्धेत मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील ए जे आर्चरीच्या खेळाडूंनी यश संपादित करीत पुन्हा एकदा आपली दावेदारी दाखवली आहे AJ आर्चरीची सुवर्णकन्या कुमारी शेजल शिवाजी चव्हाण हीने ओहर ऑल गोल्ड मेडल टीम गोल्ड मेडल वैयक्तिक तीन गोल्ड मेडल व वैयक्तिक एक सिल्वर मेडल व इरफान राज महंमद मुजावर याने टीम गोल्ड मेडल व पृथ्वीराज संजय चवरे याने लक्षवेधी कामगिरी करत वैयक्तिक सिल्वर मेडल व सांधिक गोल्ड मेडलला गवसणी घातली आहे. अकॅडमीचे संस्थापक श्री. अजित वसेकर सर, श्री. सागर सुर्वे सर, श्री. विठ्ठल माळी सर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे.
सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव हरिदास रणदिवे सर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव हरिदास रणदिवे सर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.