कर्जत जि. रायगड (प्रतिनिधी) :--कडाव येथील हुतात्मा हिराजी पाटील ज्युनिअर कॉलेज या कनिष्ठ महाविद्यालयात हुतात्मा हिराजी पाटील ८१ वा स्मृतिदिन मोठ्या उतस्फुर्तपणे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी ज्ञानकमळ शिक्षण संस्था वांगणी तर्फे दिला जाणारा हुतात्मा जीवन गौरव पुरस्कार २०२४ हा पुरस्कार राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल कर्जत येथील नामवंत वकील समाजसेवक मा.अँड. गोपाळ शेळके यांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना कर्जतचे माजी नगराध्यक्ष श्री. राजेशजी लाड यांनी सांगितले कर्जत सारख्या ग्रामीण भागात शिक्षणसंस्था चालविणे अत्यंत जिकरीचे व कठीण असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कमी तुटपुंज्या सुविधा असून सुद्धा ज्ञान कमळ शिक्षण संस्थेद्वारा अत्यंत दर्जेदार व अत्यावश्यक शैक्षणिक सुविधा पुरविण्याचे काम होत आहे .या संस्थेच्या संचालका बाबत गौरवोद्गार काढले व विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा शिक्षण घेणे किती महत्वाचे आहे याबाबत पटवून दिले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अलिबागहून आलेले ज्येष्ठ पत्रकार तथा आपत्ती व्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण, आदिवासी सेवक, डॉ.जयपाल पाटील यांनी शिक्षण संस्था चालविण्यासाठी संस्थेचे संचालक प्रा.मनीषा बैकर व नामदेव बैकर यांना किती त्रास सहन करावा लागला आहे, किती अडचणींना सामना करावा लागत आहे रात्रंदिवस याचा ध्यास घ्यावा लागत आहे याचा मी साक्षीदार आहे यावेळी उपस्थित मुला मुलींना त्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा 112 क्रमांकाचा वापर करावा आणि मोबाईलचा वापर करताना चार्जिंग वर ठेवले असताना कधीही फोनवर बोलू नये आणि मित्र-मैत्रिणीला फेसबुक वर सतत विनंती पाठवू नये. यामुळे आपल्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो अपघात झाल्यास 108 व गावात बाळंतपणासाठी माहेरी आलेल्यांना 102 रुग्णवाहिकेला बोलवावी अशी माहिती दिली. यावेळी अँड. गोपाळ शेळके यांना हुतात्मा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या सामाजिक ,शैक्षणिक ,राजकीय ,सांस्कृतिक कार्याबाबत उपस्थितांना माहिती दिली व हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
यावेळी बोलताना रा. जि . प आदर्श शिक्षक श्री. एन. डी. म्हात्रे सर यांनी सांगितले की शिक्षणाला वय नसते माझे अजून सुद्धा चालू आहे .मी आत्ता LLM साठी प्रवेश घेतलाआहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आवाहन केले की तुम्ही पण जास्तीच जमेल तेवढे शिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा व शिक्षण पूर्ण करावे त्यांनी हुतात्मा वर एक गीत सादर केले.
या प्रसंगी हुतात्मा जीवन गौरव पुरस्कार स्विकारताना अँड. गोपाळ शेळके यांनी आपल्या संघर्षमय जीवन प्रवासातील व शिक्षण प्रवासातील आठवणी सांगितल्या तसेच हुतात्मा हिराजी पाटील ज्यू कॉलेज कडाव च्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले की आपण एका आदर्श विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी असून हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव बदनाम होणार असे वर्तन आपल्याकडून होणार नाहीअसे आवाहन केले ज्ञानकमल शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा हुतात्मा जीवन गौरव पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड संचालका तर्फे करण्यात येत आहे एकदम हिऱ्या सारखे पारखून हा पुरस्कार संस्था संचालक प्रा. मनीषा बैकर श्री. नामदेव बैकर देण्याचा निर्णय घेतला या बाबत गौरवोद्गार काढले व हुतात्माच्या स्मृतींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाद्वारे कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेशजी लाड, डॉ.जयपाल पाटील ( आपत्ती व्यवस्थापन तज्ञ) मा. सौ. अश्विनी महाडिक ( रायगड जिल्हा उपाध्यक्ष भारतीय कृषक समाज ) श्री. मारुती बागडे ( राष्ट्रपती पुरस्कार आदर्श शिक्षक ) मा.श्री.नरेश म्हात्रे ( आदर्श शिक्षक रा. जि. प) श्री. रामचंद्र काळोखे ( सदस्य कनिष्ठ महाविद्यालय ) श्री.वसंत जाधव ( शालेय समिती सदस्य ) सचिव सौ मनीषा बैकर ( प्राचार्या कनिष्ठ महाविद्यालय बैकर) व हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
या संपूर्ण कार्यक्रमात संस्थेच्या उपक्रमाबाबत A.V. दाखवण्यात आले. हे A.V. ईटेग्रेन कंपनी चे संजीवजी जैन यांनी CSR teamच्या माध्यमातून दिलेल्या स्मार्टबोर्ड मार्फत प्रदर्शित करण्यात आले. कार्यक्रमाद्वारे कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड, डॉ.जयपाल पाटील, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ, सौ अश्विनी महाडिक, रायगड जिल्हा उपाध्यक्ष भारतीय कृषक समाज श्री. मारुती बागडे, राष्ट्रपती पुरस्कार आदर्श शिक्षक श्री.नरेश म्हात्रे, आदर्श शिक्षक रा. जि. प) श्री. रामचंद्र काळोखे, सदस्य कनिष्ठ महाविद्यालय श्री.वसंत जाधव, शालेय समिती सदस्य सौ.मनीषा बैकर, प्राचार्या कनिष्ठ महविद्यालय,ज्ञानकमल शिक्षण संस्था सचिव नामदेव बैकर तसेच शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी उपस्थित होते.