*आमदार समाधान आवताडे यांच्या मतदारसंघात विविध कामाच्या उद्-घाटनाचा सपाटा*

0
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या मतदारसंघात सध्या रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य आदी कामांना भरघोस असा निधी आणून नुसता धमाका सुरू केला असून आज ११ एप्रिल रोजी पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील गुरुकृपा हौसिंग सोसायटी येथील दत्त मंदिरामध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ
 भूमिपूजन सोहळा 
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.
 यावेळी सभापती महोदय यांनी बोलताना सांगितले की, आपण कामे मागण्यास कुठे कमी पडू नका आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार समाधान दादा अवताडे यांनी मतदारसंघात अल्पवधी काळात जनतेच्या गरजा लक्षात घेता पाणी रस्ते वीज आरोग्य शिक्षण आधी कामे करण्याचा सपाटा लावला आहे. आज आमदार साहेब यांचे बंधू मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती सोमनाथ मालक अवताडे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
एकच ध्यास जनतेचा सर्वांगीण विकास.........
 पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यचा कायापालट करण्याचा मानस उरासी बाळगत पंढरपूर आणि मंगळवढा तालुक्यातील देखणा कायापालट करण्यासाठीं आपल्या मतदार संघात अल्पावधी काळातच  झेप भरारी घेत आमदार समाधान दादा आवताडे यांनी  विकासाकडे वाटचाल सुरू केली.

सदर प्रसंगी नगरसेवक मा. श्री. विवेक परदेशी, अदित्य फत्तेपूरकर, दिपक येळे मेंबर,राहुल गावडे,पांडूरंग वाडेकर, अर्बन बँकेचे संचालक एस.पी.कुलकर्णी सर, राजाभाऊ कौलवर,दत्त मंदिराचे अध्यक्ष डी. व्ही कुलकर्णी सर, ज्युनियर जॉनी लिव्हर रोहन लगस, हेमंत कुलकर्णी, योगेश भंडारकवठेकर, पत्रकार संकेत कुलकर्णी,गणेश दादा शिंदे नाईक,भाऊसाहेब शिंदे नाईक, संजय लवटे सर, रमेश कुंभार,सारंग कुंभार, बापू घोडके, गणेश सुरवसे, बाबु मांडवे, रविंद्र महागावकर, नाना निकम, गणेश देवमारे, भैया शिंदे रोहित सलगर, समर्थ तुळणुरे, अनिकेत तुल्ला व प्रभागातील  नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)