पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी १ कोटी ६० लाख रुपये निधी मंजूर - आमदार समाधान आवताडे

0
मंगळवेढा (प्रतिनिधी): पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे - पाटील यांच्या माध्यमातून  जनसुविधा योजनेअंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांसाठी १ कोटी ६० लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष सदस्य आमदार समाधान आवताडे यांनी दिली. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील दळणवळण सुविधेच्या अनुषंगाने विविध रस्ते गेल्या अनेक दिवसांपासून मजबूत व दुरुस्त करणे अतिशय गरजेचे झाले होते. सदर रस्त्यांच्या आजूबाजूला वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रवास मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी हे रस्ते सुधारित करण्यात यावेत यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी संबंधित विभागाकडे या रस्त्यांसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. आमदार आवताडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाल्याने या रस्त्यांचा कायापालट होण्यास खूप मोठी झाली आहे.

 सदर निधी अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील मंजूर झालेले रस्ते व निधी रक्कम - कात्राळ येथील ग्रामपंचायत कार्यालय सुशोभिकरण करणे व कात्राळ ते काराडे वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख,  शिवणगी येथील गावांतर्गत  काँक्रिटीकरण करणे ४ लाख, लमाणतांडा येथील स्मशानभूमी वॉलकंपाऊंड ४ लाख, रहाटेवाडी येथील गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे व स्मशानभूमी संरक्षक भिंत बांधणे ९ लाख, मारापुर येथील गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे ४ लाख, घरनिकी येथील दिलीप भुसे शेत ते एडके वस्तीपर्यंत रस्ता सुधारणा करणे ४ लाख, हाजापुर येथील बाळू गावंड वस्ती ते हाजापूर कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे ४ लाख, पाटखळ येथील बागडे बाबा मंदिर ते मेटकरीवाडी ते बाळासाहेब शिंदे घर रस्ता सुधारणा करणे ४ लाख, रेवेवाडी येथील गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे ४ लाख, खोमनाळ येथील गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे ४ लाख, भालेवाडी येथील गावांतर्गत बोअर, मोटर, हौद बांधून पाणीपुरवठा करणे ४ लाख, बोराळे येथील बोराळे ते मातोळी जुना रस्ता सुधारणा करणे ४ लाख, खुपसंगी येथील लाला बाबा मंदिर ते खुपसंगी रस्ता सुधारणा करणे ४ लाख, डोंगरगाव येथील खडतरे वस्ती ते शिव रस्ता डोंगरगावकडे जोडणारा रस्ता सुधारणा करणे ४ लाख, गुंजेगाव येथील आंधळगाव रस्त्यापासून मेटकरीवाडी शाळेकडे कडे जाणार रस्ता सुधारणा करणे ४ लाख, माळेवाडी येथील गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे ४ लाख, कचरेवाडी येथील कचरेवाडी ते गणेशवाडी रस्ता सुधारणा करणे ४ लाख, नंदेश्वर येथील दहनभूमी रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, गणेशवाडी येथील स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे ५ लाख, फटेवाडी येथील स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे ५ लाख, डोणज येथील मुस्लिम स्मशानभूमी पेव्हर ब्लॉक बसविणे ४ लाख, मुढवी येथील सूर्यकांत ठेंगील वस्ती गट क्र.५१५  धर्मगाव रोड सुधारणा करणे ११लाख, हुलजंती येथील महालिंगराया मंदिर ते लक्ष्मी पुजारी घर रस्ता सुधारणा करणे ११ लाख,  हिवरगाव येथील हिवरगाव ते जालिहाळ रस्ता सुधारणा करणे ७ लाख.

सदर योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील मंजूर झालेले रस्ते व निधी रक्कम - गोपाळपूर येथील पंढरपूर - मंगळवेढा रोड ते बनसोडे वस्ती रस्ता सुधारणा करणे ४ लाख, बोहाळी येथील कुंभार खोरा ते उंबरगाव शिव रस्ता सुधारणा करणे ४ लाख, कौठाळी येथील धुमाळ पट्टा ते जुना अकलूज रोड रस्ता सुधारणा करणे ५ लाख, तावशी येथील माणिक यादव घर ते दत्तात्रय नागणे घर रस्ता सुधारणा करणे ५ लाख, खर्डी येथील महादेव हावळे वस्ती  ते खर्डी चौकी रस्ता सुधारणा करणे ५ लाख, कासेगाव येथील भाडघर पूल ते लिंगे वस्ती रस्ता सुधारणा करणे व ताटे मळा देशमुख वस्ती ते महादेव आर्वे वस्ती रस्ता सुधारणा करणे १५ लाख.

 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)