विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित गुरुशिष्य वंदना गीताचा कार्यक्रम
पंढरपूर प्रतिनिधी - श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून महात्मा ज्योतिराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्राचे महागायक आदर्श शिंदे यांच्या गुरुशिष्य वंदना गीतांचा कार्यक्रम दि.१६एप्रिल रोजी सायं ६वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल (गोपाळपूर रोड) पंढरपूर येथे विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
पंढरपूर तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच महागायक आदर्श शिंदे यांचा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दि.१३रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील, सुनील सर्वगोड, सर्व गोड संतोष सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, सिद्धार्थ जाधव, महेश साठे, उमेश सासवडकर, उमेश सर्वगोड, ॲड.कीर्तीपाल सर्वगोड, पत्रकार अभिराज उबाळे, प्रशांत लोंढे, नाना वाघमारे, अजित खिलारे, संतोष सरवगोड, समाधान लोखंडे, सागर गायकवाड, स्वप्नील कांबळे, समाधान बनकर, दत्ता माळी, श्रीनिवास उपळकर, आण्णा वायदंडे यासह आदी पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे स्टेज पूजन करण्यात आले...