बाल वारकरी संस्कार शिबिर

0
गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था आळंदी संचलित बाल वारकरी संस्कार शिबिराचे आयोजन तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती बाल वारकरी संस्कार शिबिराच्या आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. 

दिनांक ६ मे रोजी सुरू होणाऱ्या या बाल वारकरी संस्कार शिबिरामध्ये गायन, पखवाज वादन, पेटी वादन, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, काकडा भजन, बैठक भजन यासह वारकरी संप्रदायातील वैविध्यपूर्ण विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

या शिबिरामध्ये इयत्ता चौथी पासून पुढील सर्व इयत्तातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. नाममात्र फी मध्ये राहण्याची आणि भोजनाची सोय केली जाणार असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आचरक आचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी, संत, महंत, अभ्यासक, व्याख्याते इत्यादी मंडळींची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. 

चंगळवादामध्ये अडकलेल्या पिढीला वारकरी संस्कारामध्ये आणण्यासाठी आणि संस्कारयुक्त समाज घडवण्याच्या उद्देशाने या बाल वारकरी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.  

वारकरी शिबिरामध्ये सहभागी होत असताना स्वतःसाठी आवश्यक असलेले अंथरून, पांघरून, ताट, तांब्या, पेला, वाटी आणि वैयक्तिक स्वच्छतेसाठी लागणारे सर्व साहित्य शिबिरार्थींनी स्वतः सोबत आणावयाचे आहे. मोबाईल, दागिने, मौल्यवान वस्तू, तांत्रिक वस्तू अशा कोणत्याही प्रकारच्या वस्तू शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या शिबिरार्थींनी सोबत आणू नये आणल्यास व गहाळ झाल्यास संयोजक त्याला जबाबदार असणार नाही, अशी महत्त्वाची सूचना संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. 

शिबिरामध्ये प्रवेश घेणाऱ्या शिबिरार्थींना शिबिर आयोजक आणि संयोजकांनी घालून दिलेले सर्व नियम लागू असतील. अन्नदानास सहकार्य करु इच्छिणारे भाविक अन्नदानास सहकार्य करु शकतात. 

अधिकाधिक विद्यार्थी, वारकरी बांधव आणि वारकरी संप्रदायावर प्रेम करणाऱ्या साधकांनी या शिबिरामध्ये प्रवेश घ्यावा, अशा प्रकारचे आवाहन आयोजक ह. भ. प. संत साहित्याचे अभ्यासक सूर्याजी महाराज भोसले तसेच सुप्रसिद्ध मृदंगाचार्य ह. भ. प. वेदांत राखोंडे महाराज यांच्या वतीने करण्यात करण्यात आलेले आहे. 

शिबिरामध्ये सहभाग घेण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा... ७७४४८६९६६०, ९५२७३५६२३२, ९३७३७४६८८०

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)