पंढरपूर:( प्रतिनिधी)
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले डाॅ. समीर कटेकर यांची नुकतीच “टीपीओ ऑफ द इयर” ॲवार्ड साठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील डाॅ. समीर कटेकर यांनी चालू शैक्षणिक वर्षांत सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील विद्यार्थ्यांना २०० हून अधिक नामंकित कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्याने डाॅ. समीर कटेकर यांना “टीपीओ ऑफ द इयर” ॲवार्ड देण्यात आला आहे. हा ॲवार्ड २७ एप्रिल २०२३ रोजी इंदुर येथील अंबर गार्डन येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्याने डाॅ. समीर कटेकर यांना “टीपीओ ऑफ द इयर” ॲवार्ड जाहीर झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. श्याम कलकर्णी, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. बाळासाहेब गंधारे, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. राजेंद्र पाटील, डाॅ. संपत देशमुख, डाॅ. अतुल आराध्ये सह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.