पंढरपूर (प्रतिनिधी) सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या श्री संजय बाबा ननवरे यांनी नुकत्याच झालेल्या महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवून एक वेगळ्या प्रकारचा आदर्श निर्माण केला आहे.
श्री. संजय बाबा हे कोळी समाजाचे असूनही त्यांनी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी केली. खरेतर अशा थोर विचारांच्या महापुरुषांना आपणच विविध समाजाच्या, जातीपातीच्या चौकटीत बसवितो . यामुळे निष्कारण समाजात दुफळी निर्माण होते.पण श्री. संजय बाबा यांनी याला फाटा देऊन स्व-खर्चाने अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून एक वेगळ्या प्रकारचा आदर्श निर्माण केला आहे.
कोणीही गोरगरीब, वंचित संकटात असला की संजय बाबा कायमच अग्रेसर असतात.अनेक गरीब मुलांना, विद्यार्थिनींना शिक्षणासाठी भरघोस आर्थिक मदत केली आहे.
त्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी असणारा विश्वास,निष्ठा पाहून नागरिक अचंबित झाले, डॉ आंबेडकर यांनी देशासाठी केलेल्या अमूल्य कार्याचा गौरव पाहून इतर समाजातील लोकही कसा आदर, मान सन्मान राखतात याचा उत्तम, आदर्श उदाहरण म्हणजे श्री. संजय बाबा ठरत आहेत. सध्या पंढरपूर शहरात संजय बाबा यांचीच चर्चा सुरू आहे.
अशी माणसं महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शहरात झाली, तर खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांचा प्रभाव असलेला महाराष्ट्र देशभरात दिसून येईल.