तालुक्याचा नेता होणे एव्हढे सोपे नसते..- परिचारक

0
पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक होणार असून परिचारक गटाच्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक शेतकरी विकास आघाडी पॅनलची काल  रविवार दिनांक २३ एप्रिल रोजी गादेगाव येथे जाहीर प्रचार सभा झाली.
यावेळी माजी आमदार श्री प्रशांत परिचारक म्हणाले, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले.पण विरोधकांना तालुक्याचा नेता व्हायचे असल्याने, त्यांनी तडजोडीची तयारी न दाखविता निवडणुक लावली, पण तालुक्याचा नेता होणे एव्हढे सोपे नसते, अशी टीका करून त्यांनी बाजार समितीची मागील गेल्या ३० वर्षातील वाढती प्रगतीची कमान सांगितली. यावेळी युवा नेते प्रणव परिचारक, दाजी भुसनर, वामनराव माने, लक्ष्मण धनवडे, गणेश बागल, हरीश दादा गायकवाड, आबासाहेब देशमुख, श्री पांडुरंग साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन कैलास खुळे, भास्कर कसगावडे, प्रशांत देशमुख, दिलीप आप्पा घाडगे, सोमनाथ डोंबे, दिनकर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)