महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा शाहीरी प्रशिक्षण शिबीराचा समारोप

0


पंढरपूर - शाहिरी लोककलेची परंपरा ही टिकून राहावी व शाहिरी लोककला जतन व संवर्धन व्हावी यासाठी असे शाहिरी प्रशिक्षण शिबिर महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक विभागाने वर्षानुवर्षे घेऊन शाहिरी या लोककलेला उत्तेजन द्यावे. मी शिबिरार्थी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पाहून भारावून गेलो असे म्हणत शाहीर महाराष्ट्रात तयार झाले तर महाराष्ट्राच्या इतिहासाची मनोरंजनातून, शाहिरी पोवाड्यातून प्रबोधनात्मक जनजागृती शाहिरांच्या माध्यमातून होऊ शकते हे आज अनुभवायला मिळाले सर्व विद्यार्थ्यांचे शिबिर संचालकाचे व कलावंतांचे माजी आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांनी अभिनंदन केले.
सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आयोजित शाहिरी प्रशिक्षण शिबिर वीस दिवसाचे पुर्ण झाले त्याचा दिनांक 31 मार्च 2023 रोजी समारोप झाला या समारोप प्रसंगी 36 जिल्ह्यातून आर.ओ.बी. ग्रुपचे सर्व कलावंत लीडर जिल्ह्यातील कलावंत उपस्थित होते. यावेळी समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील बोलत होते.




शाहिरी ही लोककला जतन व संवर्धन व्हावी-शाहीर सुभाष गोरे
या शिबिराचे संचालक शाहीर सुभाष गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात पांडुरंगाच्या पावन नगरीत पंढरपूर येथे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाने शाहिरी प्रशिक्षण शिबिर आयोजित करून नवयुवक शाहीर घडावेत शाहिरी ही लोककला जतन व संवर्धन व्हावी म्हणून शिबीर संचालक पदी माझी निवड केली मी प्रामाणिकपणे सांगतो या शिबिराच्या माध्यमातून पुढील युवा पिढी ही शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण हे आमचे ब्रीद वाक्य नक्कीच सार्थ ठरवणारी आहे. शाहिरी ही लोककला जतन व संवर्धन व्हावी म्हणून सांस्कृतिक कार्य संचलनालयाचे संचालक मा.विभीषण चवरे साहेबांनी माझी शाहिरी प्रशिक्षण शिबिर संचालकपदी निवड केली याबद्दल शाहीर गोरे यांनी त्यांचे आभार मानले.

भारुड सम्राज्ञी मा.चंदाताई तिवाडी यांनी केले शिबीराचे कौतुक
भारुड सम्राज्ञी मा.चंदाताई तिवाडी यांनी आपल्या भाषणात सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व अभिनंदन केले सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक विभीषण चवरे व पंढरपूर येथे आयोजित शाहिरी प्रशिक्षण शिबिराचे संचालक शाहीर सम्राट सुभाष गोरे यांचेही आभार मानले असे कार्यक्रम सांस्कृतिक विभागाने वेळोवेळी राबवून महाराष्ट्राची लोककला जतन व संवर्धन करावी अशी इच्छा व्यक्त केली

यावेळी मा बाळासाहेब पोळ, अखिल भारतीय शाहीर परिषदेचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष शाहीर विजय व्यवहारे महाराष्ट्र शाहीर परिषदेचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश खाडे अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, भारुड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी, मा.प्रा.सयाजीराव गायकवाड कोल्हापूर विद्यापीठ परशु पवार आदी मान्यवर उपस्थित होते..



या कार्यक्रमाचा समारोप शिबिरार्थी वीस विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी वीस दिवस घेतलेले प्रशिक्षण यांचे व्यासपीठावर सादरीकरण " व्रत शाहिरी लोककलेच लेन महाराष्ट्राचं " सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. समारोप अतिउत्साहात पार पडला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहीर प्रतापसिंह गोरे, विक्रम गोरे, विशाल मागाडे, भैय्या पांडे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन शाहीर उत्तम गायकर यांनी केले तर आभार शाहीर बाळासाहेब मालुसकर यांनी मानले
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)