पंढरपूर. प्रतिनिधी - यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध झाल्याने संस्थेच्या मा.संचालक मंडळाची सभा गुरुवार दि.30/03/2023 रोजी निवडणुक निर्णय अधिकारी मा.अविनाश कांबळे सोलापूर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होवून संस्थेचे चेअरमन पदी शहाजी भिमराव साळूंखे तर व्हा.चेअरमनपदी श्रीमती.सुंदर नारायण मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित विद्यमान चेअरमन शहाजी (बापु) साळूंखे आपले मनोगत व्यक्त करताना यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना 1986 साली पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार कै.औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांनी केली. त्यामगील एकच ध्येय म्हणजे माझे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचा आर्थिक विकास करणे हाच होता. त्यांचे कार्य पुढे सहकार शिरोमणी वसंतराव (दादा) काळे यांनी व संस्थेचे माजी चेअरमन कै.नारायण दादा मोरे यांनी संस्थेचा विकास रथ पुढे चालवून वाटचाल सुरु ठेवली. याच काळात संस्थेवर आर्थिक संकट निर्माण झाल्याने संस्थेचे विकास थांबला त्याकाळात आमचे संस्थेचे मार्गदर्शक सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांनी संस्थेस कारखान्याच्या वतीने मोठी आर्थिक मदत करुन अडचणीवर मात करण्यासाठी मोलाची मदत केली. त्याबददल मी त्यांचे आभार मानतो. आज संस्थेच्या 25 कोटीच्या वर ठेवी असून वाटप कर्जे 20 कोटी वर आहे. इतर सहकारी संस्था व बँकांत 15 कोटी पर्यंत गुंतवणुक केली आहे. आज मितीस संस्थेच्या मालकीची पंढरपूर शहरात आर.सी.सी.बांधकाम असलेली भव्य चार मजली इमारत असून येथे संस्थेचे कामकाज चालु आहे व शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे कार्य चालु आहे. आपली संस्था सतत नफयात असून दरवर्षी सभासदांना 10 % लाभांष वाटप करते. संस्था याही पुढे असाच कायम शेतकऱ्यांचा विकास करुन सभासद ठेवीदार यांचे हित जोपासून यशाच्या शिखरावर संस्था ठेवू असे आम्ही सर्व संचालकांच्या वतीने आश्वासन देतो.
सदर निवडीचे वेळी नवनिर्वाचित संचालक बापुसो दांडगे, विलास जगदाळे, रणजीत पाटील, रमेश पाटील, सुभाष कुंभार, ज्ञानोबा घाडगे, महादेश शिखरे, मल्हारी गलांडे, संचालिका रंजना शिंदे, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक मारुती भोसले, दिनकर कदम, भारत कोळेकर, बिभिषण पवार, राजाराम पाटील, योगेश ताड, इब्राहिम मुजावर, बाळासाहेब कौलगे,सुधाकर कवडे, माजी संचालक पांडूरंग कौलगे, प्राथमिक शिक्षक संघाचे नेते बाळासाहेब काळे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे माजी चेअरमन महादेव देठे, अर्जुन जाधव, संग्राम गायकवाड, गणेश माने, पांडूरंग मोरे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार, संचालक विलासराव काळे, अनिल नागटिळक, सिध्देश्वर मोरे, सत्यवान साळूंखे, पोपट घालमे, शहाजी पाटील, सुभाष पाटील, अनंता घालमे, नवनाथ पवार, ज्योतीराम साळूंखे, लक्ष्मण साळूंखे, नागनाथ धुमाळ, बंडू पवार, शहाजी पवार, ज्योतीराम पोरे, बाबासो पवार सर, राजेंद्र पवार, बाबासाहेब करपे सभासद, शाखा आधिकारी शरद पाटील, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यवस्थापक सुनिल देसाई यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक शंकर कवडे यांनी मानले.