भगवान श्रीपरशुराम परिक्रमा पुणे येथून सुरू

0


पुणे (प्रतिनिधी) -:  भगवान श्रीपरशुराम जन्मोत्सवानिमित्त गेले 8 वर्षे अहमदनगर ते  भगवान श्रीपरशुराम जन्मस्थान जनापाव (मध्यप्रदेश) अशी परिक्रमा काढली जाते. यावर्षी पासून सदर परिक्रमा पुणे येथून सुरु होऊन अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर – माहूर मार्गे जनापाव येथे जाणार आहे. या परिक्रमेची सुरुवात आज पुण्यातील मानाचा पाचवा गणपती श्री. केसरीवाडा गणपतीची व  भगवान श्रीपरशुराम यांची आरती करून झाली. परशुराम सेवा संघाच्या पुढाकाराने यावर्षी हि यात्रा निघत असून भाजपचे प्रदेश प्रवक्ते श्री. संदीपजी खर्डेकर, लोकमान्य टिळकांचे वंशज श्री. शैलेशजी टिळक, परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. विश्वजीत देशपांडे, आरपीआय ब्राह्मण आघाडीचे राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, परिक्रमा आयोजक श्री. शिवप्रसाद पुंडे यांचे हस्ते पूजन व आरती करण्यात आली.


यावेळी परशुराम सेवा संघाचे कार्याध्यक्ष उपेंद्र जपे, प्रदेश सरचिटणीस  ऋषिकेश सुमंत, पुणे जिल्हाध्यक्ष सागर मांडके, पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष  स्वप्नील कुलकर्णी, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ. माधुरीताई कुलकर्णी,  संकेत जोशी,  मदन सिन्नरकर, सौ. सिन्नरकर, सौ. संजीवनी पांडे, अतुल शुक्ल, श्रिया देशमुख, प्रसाद बर्वे, अभिजित आपटे, निर्मल देशपांडे ,दत्तात्रय देशपांडे, हरी देशपांडे ,श्रेयस देशपांडे ,रवींद्र कुलकर्णी, मनोज कुलकर्णी ,ऋषिकेश गालफाडे, अविनाश कलमे, सुनील कुलकर्णी ,दीपक देवळे ,नागनाथ देशपांडे आदी उपस्थित होते..

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)