पंढरपूर दि.01:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
तहसिल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या ध्वजारोहण सोहळयास तहसिलदार सुशिल बेल्हेकर, अप्पर तहसिलदार समाधान घुटूकडे,गटविकास अधिकारी प्रशांत काळे, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, पंडीत कोळी, वैभव बुचके, बाल विकास प्रकल्प अधिकारी अमृत सरडे उपस्थित होते. यावेळी पोलीस पथकाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी स्वांतत्र्यसैनिक, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.