पंढरपूर प्रतिनिधी:पंढरपूर तालुक्यातील उपक्रमशील ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या देगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पत्रकार व ग्रामपंचायत सदस्य श्री समाधान भोई यांची बिनविरोध निवड करण्यात आहे.या ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री रणजीत बनगोसावी यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या जागेवर श्री समाधान भोई यांची निवड करण्यात आली आहे.१३ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत सौ.सीमा संजय घाडगे या ह्या ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून कारभार पाहत आहेत.या निवडीसाठी ग्रा.सदस्य श्री समीर शेख,श्री रणजीत बनगोसावी,सदस्य श्री धर्मेंद्र घाडगे,सदस्य श्री बाळू वायदंडे, सदस्या सौ भाग्यश्री घाडगे, सदस्या सुरवंता खरात, सदस्या सौ सीताबाई वायदंडे आदींसह
राष्ट्रवादी उपाध्यक्ष श्री धनाजी नाना घाडगे,श्री संजय घाडगे,नंदकुमार बनगोसावी,झाकीर शेख,श्री पांडुरंग वाघमारे,श्री गणेश लेंडवे,श्री समाधान घाडगे,श्री कैलास वायदंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.