दादासाहेब कदम यांना राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार...

0
पंढरपूर - येथील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने दिला जाणारा डॉ . बाबासाहेब आंबेडकर जेष्ठ पत्रकार राज्यस्तरीय  पुरस्कार पत्रकार दादासाहेब कदम यांनी जाहीर करण्यात आला आहे.  
हा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये  सायंकाळी ६ वाजता येथील शिवतिर्थ, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पत्रकार कदम यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पत्रकार कदम यांनी आपल्या लेखणीतून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली असून वि विध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शब्दगौरव केला आहे. समाजातील घटकांना समाज कार्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्या समाज  कार्याला विशेष बळकटी  देणारा पत्रकारीतेचा एक नवीन प्रघात त्यांनी समोर आणला आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेवून विश्वभूषण डॉ .बाबासाहेब आंबेडकर प्रितष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डी.राज सर्वगोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रितष्ठानच्यावतीने कदम यांना या पुरस्काराची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे यावेळी विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या इतर मान्यवरांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
पत्रकार दादासाहेब कदम यांना जाहीर झालेल्या  या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)