पंढरपूर (प्रतिनिधी) दि. 1३:- पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे सोनके ता.पंढरपूर, जि. सोलापूर येथील एका शेतातील वस्तीवर एक इसम हा सुगंधी चंदनसाठा बाळगून त्याची विक्री करण्याकरीता जाणार असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. सदरची बातमी पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना कळविल्यानंतर त्यांना तात्काळ कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले.
सदर बातमीच्या ठिकाणी आलेनंतर एका शेतातील वस्तीवर एक इसम त्याच्या पत्राशेडच्या समोर करवतीने काही लाकडे कापत असताना दिसला, बातमी प्रमाणे संशय आल्याने तो आम्हांस पाहून पळून जाण्याच्या बेतात असताना त्यास ताब्यात घेतले. त्याचे जवळ एका पांढ-या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणीमध्ये व २ पांढ-या रंगाच्या पिशवीमध्ये लाकडे असल्याचे दिसून आले. त्यास हातात घेवून त्याचे वास घेवून पाहिले असता सदरची लाकडे ही सुगंधी चंदनाचीच असल्याची खात्री झाली. तसेच त्याचे बाजूला एक इलेक्ट्रीक वजनकाटा मिळून आला.
त्याबाबत विचारपूस केली असता, त्याचेकडे कोणताही परवाना नसून तो स्वतः व स्थानिक काही लोकांकडून चोरीकरून आणलेली सुगंधी चंदनाची लाकडे विकत घेवून कमिशन बेसवर पुढे त्याची विक्री करीत असलेबाबत सांगितले. त्याचे कब्जातून ६३.५५ किलोग्रॅम वजनाची सुगंधी चंदनाची लाकडे,लोखंडी करवत, इलेक्ट्रीक वजनकाटा असे साहित्यासह एकूण ४,५२,६५० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुरंन 199/2023 भादविसंक 379 , 34 व भारतीय वन अधिनियम 1860 चे कलम 42 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीश सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, स.फौ.ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय डोंगरे,चालक समीर शेख यांनी बजावली आहे.*