पंढरपूर -
बडवे गल्ली येथील श्रीब्रह्मचैतन्य प्रतिष्ठान आयोजित चैत्रशुद्ध प्रतिपदा ते चैत्रशुद्ध नवमी तिथीपर्यंत दररोज सकाळी अभिषेक, दुपारी विविध महिला भजनी मंडळांची भजन सेवा व सायंकाळी "श्री रामायण कथा" अशा पद्धतीने उत्सव पार पडला.
रामायण कथा समाप्ती निमित्त दिनांक ०७/०४/२०२३ शुक्रवार या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केलेले होते.
या दिवशी सकाळी लघुरुद्र अभिषेक संपन्न झाला व श्रीसंत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराज यांना जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या रूपात सुंदर पोशाख करण्यात आला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रह्मचैतन्य प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.