सोलापूर (प्रतिनिधी) :- पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, दैनिक तुफान क्रांतीचे विभागीय उप संपादक, साप्ताहिक कार्यसम्राटचे मुख्य संपादक, आक्रमक व अभ्यासू पत्रकार म्हणून, संपूर्ण महाराष्ट्रला परिचित असलेले, सोलापूर येथील निर्भिड पत्रकार, यशवंत पवार यांच्या सदर कार्याची दखल घेऊन, अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे,संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदूरकर, राष्ट्रीय अध्यक्ष रमेश इंदूरकर, राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे, राज्य प्रसिद्धी प्रमुख शेषेराव सोपने मामा यांनी,सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड केली.
यशवंत पवार हे गेली अनेक वर्षांपासून राज्यातील, पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी मांडत असून, शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी अहोरात्र काम करत आहेत, यशवंत पवार यांनी राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, पत्रकार संरक्षण कायदा, जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, पत्रकारांवर होणारे हल्ले, धमकी, मारहाण, पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना, घरकुल योजना, यादीवर नसलेल्या वृतपत्राना पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती,राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता, खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची,स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी, यासह राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन, उपोषण, निवेदन व पत्रव्यवहार करून, पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात.
पोलिसांचे प्रश्न सरकारी दरबारात मांडणार
महाराष्ट्र राज्यातील पोलीसांचे प्रश्न तसेच व अडचणी समस्या आपण राज्यसरकारकडे मांडून पोलिसांचे व महिला अधिकारी यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असे माध्यमांशी बोलताना, आवर्जून सांगितले, त्यांच्या पुढील कार्यास पोलीस हक्क संरक्षक संघटनाचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदूरकर राष्ट्रीय अध्यक्ष रमेश इंदूरकर राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे राज्य प्रसिद्धी प्रमुख शेषेराव सोपने मामा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत