सोलापूर (प्रतिनिधी) :- येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या युवक शाखेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा अकरावी- बारावी एक गट, पदवी प्रथम वर्ष ते पदव्युत्तर दुसरा गट आणि खुला गट अशा तीन गटात होईल. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र पारितोषिके दिली जाणार आहेत. आपला निबंध स्वहस्ताक्षरात लिहून ५ मे पर्यंत देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, समर्थ रामदास संकुल, कन्हैयालाल मेडिकल स्टोअर्स मागे, दत्त चौक सोलापूर येथे सायंकाळी 5 ते 7 या वेळेत जमा करावयाचे आहेत. शहराबाहेरील स्पर्धकांनी याच पत्त्यावर निबंध पाठवावेत. निबंधाची शब्द मर्यादा अकरावी बारावी या गटासाठी ४०० इतकी असून अन्य गटासाठी ७०० इतकी आहे.
सर्व गटासाठी १) विज्ञानवादी सावरकर २) सावरकरांचे सामाजिक कार्य ३) मला समजलेले सावरकर ४) भारताच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांचे योगदान हे चार विषय आहेत. यापैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहून कार्यालयात जमा करावयाचा आहे. निबंध स्पर्धा मोफत आहे.
स्पर्धकांनी निबंध जमा करताना निबंधाच्या वरील बाजूस आपले पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि महाविद्यालयीन विद्यार्थी असल्यास आपली इयत्ता लिहिणे आवश्यक आहे.
निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २७ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिवशी होणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी युवक शाखेचे अध्यक्ष सुशांत कुलकर्णी (८८८८७४८६४७) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे कार्यवाह श्याम जोशी यांनी केले आहे.