पंढरपूर - (दि. १४)
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी पंढरपूर शहरातून पोलिसांनी पायी पेट्रोलिंग करावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.
सर्वांत मोठे तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरीत दैनंदिन पन्नास हजार भाविक हजेरी लावतात. या भाविकांना लुटण्याचे तसेच चोरीचे प्रसंग अनेकदा होताना दिसतात, तसेच शहरात वाढलेल्या गुंडगिरीमुळे भर रस्त्यांवर हाणामाऱ्या होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना सरदेशपांडे यांनी, पंढरपुर येथे शांतता व सुव्यवस्था राहणे गरजेचे आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षेलादेखील प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. समाजकंटक, गुंडगिरी करणारे, भुरटे चोर यांच्यावर जरब बसावी म्हणून येथील पोलिस अधिकाऱ्यांना रोज संध्याकाळी पायी पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.