लहान वयात संस्कृत शिकायला सुरुवात केल्या मुळे भविष्यात संस्कृत ज्ञान जगा पुढे आणण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील - सी. ए. अभय माटे*
संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्रात सुरु असलेल्या 42 संस्कृत बालकेंद्राचा एक दिवसीय बालोत्सवात मेळाव्यात सी. ए. अभय माटे समारोप प्रसंगी बोलत होते. पुढे श्री. माटे यांनी लहान वयात निर्धार करायचा व आयुष्य भर त्या निर्धारचा पाठपुरावा केल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला ते करण्यापासुन वाचवू शकत नाही व त्यातूनच आपले जीवन यशस्वी होते, असे ही विविध खेळ व गोष्टी च्या माध्यमातून सांगितले.
संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत द्वारा आयोजित संस्कृत बालोत्सव भावे प्राथमिक प्रशाला ,पुणे येथे २३ एप्रिल रोजी रविवारी एकदिवसीय वार्षिक बालोत्सव दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमाला प्रांतातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून बालकेंद्र शिक्षक आणि त्यात संस्कृत शिकलेले शंभराहून अधिक बालक व पालक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्कृत भारतीचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख श्री. शिरीषजी भेडसगावकर, प्रांतमंत्री श्री.विनय दुनाखे, प्रांतक्षेत्रमंत्री श्री. गजानन अम्भोरे व प्रांतबालकेंद्र प्रमुखा सौ.संगीता अम्भोरे यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलनाने झाले.
अतिशय आनंदी व संस्कृतमय वातावरण व बालांचा उत्साह यामुळे हा कार्यक्रम नेत्रदीपक पद्धतीने पार पडला.उद्घाटननंतर श्री. भेडसगावकरांनी अतिशय रसाळ व सरल संस्कृत मधून अफजल खान वध ही गोष्ट संस्कृत मधुन सांगितली.
त्यावेळी दृक श्राव्य माध्यमाचा प्रभावी वापर व श्री. राघवेंद्र देशपांडे यांनी संस्कृत पोवाडा सादर करून बालांमध्ये उत्साह वाढवला.
निरनिराळ्या बालकेंद्रातील मुलांनी संस्कृतमध्ये सामूहिक गीत, नाटक, सम्भाषण असे नेत्रदीपक कार्यक्रम सादर केले. मुलांसाठी संस्कृत मधून संस्कृत क्रीडा आयोजित केल्या होत्या. श्री. भेडजगावकर व श्री. अम्भोरे यांच्या उपस्थित पालकांबरोबर चर्चा आयोजित केली होती.
ग्रंथदिनाचे औचित्य साधुन शोभायात्रेमधे उपस्थित बालक ,पालक, शिक्षक, पदाधिकारी हे संस्कृत ग्रंथ दिंडीत उत्साहाने सहभागी झाले होते.
समारोपाला संस्कृत भारतीचे प्रांत-अध्यक्ष श्री.सतिश परांजपे , सी. ए. अभय माटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे महानगर बालकेंद्र प्रमुख वत्सला दुराईराजन यांनी केले.श्री शशिकांत शेंडे, श्री. नितीन तारे यांनी पुस्तक विक्रीची उत्तम व्यवस्था ही केली होती.कार्यक्रमाचे दरम्यान पुढचे वर्षी अधिक संख्येने व अनेक संस्कृत बालकेंद्र च्या उपस्थित करण्याचा निर्धार व्यक्त केला.