कर्जत येथे रायगड जिल्हास्तरीय काव्य संमेलन

0
अलिबाग= शहीद भगतसिंग स्मृती दिनानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा कर्जत तर्फे रायगड जिल्हास्तरीय 12 वे कवी संमेलन रविवार दिनांक 23 एप्रिल. रोजी सकाळी 11 ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत, महालक्ष्मी गेस्ट  हाँऊस मोठे वेणगाव तालुका कर्जत येथे आयोजित केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक एल. बी. पाटील रायगड भूषण आणि सदस्य महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ, कार्यक्रमाचे उद् घाटक डॉ. मंगेश देशमुख महासंचालक छत्रपती शिवाजीमहाराज लोक विद्यापीठ अमरावती तर स्वागताध्यक्ष ॲड. भारती ढाकसळ, ॲड. संतोष शेळके, ॲड. संतोष पाटील जोहेकर भूषविणार आहेत.
कवी संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर शेठ अध्यक्ष कोमसाप महाड, रायगड भूषण जयपाल पाटील तथा आपत्ती व्यवस्थापन तज्ञ अलिबाग, संजय गुंजाळ, अश्विनी पालकर सरपंच मोठे वेणगाव,भाई गायकर शिवसेना जेष्ठ नेते, सुनील राणे मोठे वेणगांव,नरेंद्र आत्माराम ठाकूर. दिग्दर्शक, चित्रपट कुणब्याचं पोर , प्रकाश रेड्डी शहीद भगतसिंह पुस्तकाचे लेखक व जेष्ठ कम्युनिस्ट नेते महाराष्ट्र,मिलिंद रानडे कामगार नेते मुंबई,गणेश कोळी, राजेंद्र राठोड, विलास भगतपनवेल, डॉ. मर्दाने कर्जत,जनार्दन पाटील तुर्भे, उदय कटे ज्येष्ठ कुणबी नेते रायगड आणि रायगडातील कर्जत, खालापूर, पेण, पनवेल, उरण, रोहा, माणगाव, महाड, श्रीवर्धन, तळा, अलिबाग, सुधागड- पाली, मुरुड, पोलादपूर येथील 45 निमंत्रक कवी कवींना बोलाविले आहे. या भव्य कविता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खोपोली येथील जनार्दन सताने सर व तळा येथील हेमंत बारटक्के करणार आहेत. रायगडातील इतर कवींना कार्यक्रमास सहभागी होणे असल्यास ॲड. गोपाळ शेळके चित्रपट निर्माते कुंणब्याचं पोर अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, कर्जत संपर्क क्रमांक मो.९३२३०२५७३०/९६६५०२५२५१ व०२१४८=२२३३१७ येथे संपर्क साधावा.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)