सामाजिक न्याय विभागातर्फे महिनाभर सामाजिक न्याय पर्व

0

सोलापूर, (जि. मा. का.)  –  सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दि १ एप्रिल ते दि. १ मे या कालावधीत सामाजिक न्याय पर्व अभियान राबवण्यात येणार असून, विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण नागनाथ चौगुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.




या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये पुढीलप्रमाणे उपक्रम

राबवण्यात येणार आहेत -  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या व मातंग समाजाच्या वस्त्यांना भेटी देणे, त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणे. रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देणे व या योजनेअंतर्गत मातंग समाजासाठी 25,000 घरे मंजूर करण्याचा निर्णय झाला आहे, त्याची अंमलबजावणी करणे. दि. 1 ते 30 एप्रिल दरम्यान जिल्हा जातपडताळणी समिती मार्फत जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष मोहिमेचे आयोजनाचे शुभारंभ करणे. सहाय्यक आयुक्त / जिल्हा समाज कल्याण अधिकारी/ जाती पडताळणी समिती कार्यालये यांनी शिक्षण विभागाशी समन्वय करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेतून जात प्रमाणपत्र वितरीत करणेबाबतचे कार्यक्रम. सामाजिक न्याय पर्वामध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती देणे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा निवासी शाळा, शासकीय वसतिगृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित वकृत्व, निबंध स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा यांचे आयोजन करणे. शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळेतील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्याचा 1 मे रोजी सत्कार करणे. शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळेची प्रवेश प्रक्रिया पार पाडणे. समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे. शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळेत वाचन प्रेरणा उपक्रम राबविणे. जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर स्वाधार शिष्यवृत्ती मिनी ट्रॅक्टर लाभार्थी, कर्मवीर गायकवाड सबळीकरण लाभार्थी यांना प्रातिनिधिक स्तरावर साहित्य वाटप करणे व योजनांची माहिती देणे. जिल्ह्यामध्ये समतादूत मार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघु नाटिकेदारे जनतेला सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत प्रबोधन करणे. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयाविषयी कार्यशाळा आयोजित करणे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह निवासी शाळा, जेष्ठ नागरीक. तृतीयपंथी, ऊसतोड कामगार यांचेसाठी आरोग्य अधिकारी मार्फत तपासणी करणे. प्रत्येक जिल्ह्यात जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व आरोग्य शिबीराचे आयोजन करणे (Health Camps ). सफाई कर्मचारी व त्यांचे पुनर्वसन कायदा 2013 जनजागृती कार्यशाळा घेणे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांची कार्यशाळा घेणे व कृषी गट तयार करून कृषी संबंधित योजनेचा लाभ देणे. जिल्हा व तालुका स्तरावर महात्मा फुले जयंती साजरी करणे, वक्त्यांना आमंत्रित करून व्याख्यानपर कार्यक्रमाचे नियोजन करणे. ऊसतोड कामगारांना नाव नोंदणी, ओळखपत्र वाटप करणे, ऊसतोड कामगारांसाठी पुर्नआगमन शिबीर आयोजित करणे (आरोग्य तपासणी व धान्य महोत्सव) ग्रामिण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्यांमध्ये स्वच्छता उपक्रम राबविणे तसेच मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुसूचित जाती वस्तीत सामाजिक विकास योजनेचा लाभ सुनिश्चित करणे. संविधान जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे. सामाजिक न्याय विभागा अंतर्गत सर्व शासकीय कार्यालय, महाविद्यालय, निवासीशाळा, आश्रमशाळा येथे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम, व्याख्यान, चर्चासत्र इ. साजरे करणे. अनुसूचित जाती व नवबोध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक आदर्श वस्ती याप्रमाणे प्रत्येक जिल्हा परिषदेमधून कमीत कमी 50 अशा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांची आदर्श वस्ती निर्माण करणे. नवउद्योजकांसाठी उद्योजकता मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करणे व शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे.

जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे रक्तदान व आरोग्य तपसणी शिबीराचे आयोजन करणे. समानसंधी केंद्रामार्फत नशामुक्त भारत अभियान अंतर्गत व्यसनमुक्त व शिष्यवृत्तीच्या योजनांच्या माहिती संदर्भात विशेष अभियान राबविणे. तृतियपंथी व्यक्तीमध्ये जनजागृती करणे, शिबीर आयोजन करणे व ओळखपत्र वाटप करणे. अंधश्रध्दा निर्मुलन कायद्याबाबत जनजागृती करणे. शासकीय वसतिगृह व निवासी शाळेतील विद्यार्थ्यांशी सुसंवाद कार्यक्रम आयोजन करणे.

समान संधी केंद्र अंतर्गत खालील विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे पुढीलप्रमाणे - अ. महात्मा फुले जयंती, ब. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, क. महाराष्ट्र दिन साजरा करणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पुर्वसंध्येला समता रजनी कार्यक्रमाचे आयोजन करावे. ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग यांना सामाजिक सुरक्षितता योजना उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करण्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद आहे.

Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)