पंढरपुरात 22 पान टपऱ्यावर कोटपा कायद्यांतर्गत कारवाया

0
चार हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल

पंढरपूर  - 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून पंढरपुरात 22 पान टपऱ्यावर कारवाया करून चार हजार दोनशे रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. 
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकाने पंढरपुरात विविध ठिकाणी धाडी टाकून दंडात्मक कारवाया केल्या. तंबाखू नियंत्रण कायदा कोटपा 2003 अंतर्गत 4 व 6 कलमांतर्गत या कारवाया करण्यात आल्या असून पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, जुना कराड नाका, पंचायत समिती, पंढरपूर बस स्टँड परिसरातील पानटपऱ्यावर कारवाई केली. 
सदर कारवाई जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ धनंजय पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, तंबाखू नियंत्रण कक्षाचे अमित महाडिक , श्रीमती मंजुश्री मुळे ,   पोलीस कॉन्स्टेबल श्री.कांबळे, पोलीस हवालदार श्री.गोडसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)