पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीमध्ये तू आमचे आईचे विरोधात प्रचार करतोस काय, तिचे विरोधात पोस्ट टाकतो काय असे म्हणून शिंदे गटाचे नेते व लक्ष्मी टाकळीचे उपसरपंच 1) संजय देविदास साठे, 2) दयानंद देविदास साठे 3) समर्थ संजय साठे 4) भोला शिंदे यांनी तू आमच्या गावात धंदा कसा करतो ते पाहतो, तुला गोेळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी फिर्यादी विजय विलास देशपांडे यांना दि.24/05/2023 रोजी दिलेली आहे व त्यांना धक्काबुकी केलेली आहे. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे दि.29/05/2023 रोजी तक्रार दिलेली असून याप्रकरणी वरील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या प्रकारे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीत गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे गुन्हा दाखल झाल्यामुळे लक्ष्मी टाकळी परिसरात खळबळ उडालेली आहे. सदरचे आरोपी हे सराईत आरोपी असून त्यांच्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडील परवानगीने घेतलेली रिव्हॉल्व्हर असून त्यामुळे सध्या मी, माझी पत्नी, लहान 2 मुले यांच्या जिवीतास कधीही धोका होवू शकतो. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व मला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती फिर्यादी विजय विलास देशपांडे यांनी सोलापूरचे पोलीस अधिक्षक यांच्याकडे केलेली आहे.