पंढरपूर मर्चंट बँकेसाठी 45 टक्के मतदान

0


पंढरपूर ( प्रतिनिधी) - पंढरपूर मर्चंट बँकेची पंचवार्षिक निवडणूक चुरशीमध्ये पार पडली. या पंढरपूर मर्चंट बँकेचे एकूण सभासद दहा हजार असे आहेत. पंढरपूर शहर परिसरामध्ये 7हजार मतदार असून व कुर्डूवाडी टेंभुर्णी करकंब महूद या ग्रामीण भागातील वाडी वस्ती व खेडेगावांमधून 3 000 सभासद असून या सर्वसाधारण सभासदांच्या पैकी.    45%   लोकांनी आज रोजी मतदान केले.

     टेंभुर्णी येथील ११०८ मतदार पैकी 384 सभासदांनी मतदान केले करकम या भागातून 1565 पैकी 554 सभासदांनी मतदानण केले मोहोळ येथील 493 सभासदांपैकी 285 सभासदांनी मतदान केले कुर्डूवाडी 1188 पैकी 407 सभासदांनी मतदान केले. पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील 7331 पैकी 2000 मतदार राजाराम इंग्लिश मीडियम  स्कूल येथील मत केंद्र  मतदान पैकी 833 सथभासदांनी मतदान केले तसेच अरिहंत इंग्लिश मीडियम च येथील पाच हजार सभासदांपैकी 1988 सभासदांनी आपले मतदान केले असे एकूण 4461 असे एकूण मतदान झालेले आहे सरासरीच्या हिशोबाने 44 ते 45 टक्के ऐकून मतदान झालेले आहे.
     सोलापूर जिल्ह्यातील तापमान हे 41 42 सेल्सिअस असताना देखील पंढरपूर मर्चंट बँकेचे सभासद हे आवर्जून मतदान करण्यासाठी आपापल्या मतदान केंद्रावर आपले बहुमोल मतदान देत असताना दिसून आले. सकाळच्या दरम्यान मध्ये सभासदांनी आपले मतदानाचे हक्क बजावण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे दिसून आले त्यानंतर दुपारी अकराच्या नंतर हळूहळू मतदार येण्याची संख्या कमी जाणवत होती परंतु साडेतीन-चार च्या वाजण्या नंतर मतदान करण्यासाठी मतदार धावपळीत येत असल्याचे दिसून आले.
         आज रोजी झालेल्या पंढरपूर मर्चंट बँकेचे निवडणुकीचा निकाल उद्या सोमवार दिनांक पंधरा रोजी जाहीर करण्यात येणार आहे असे समजते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)