हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना ’ पंढरपूर येथे कार्यान्वित

0

पंढरपूर दि. 1 (प्रतिनिधी)  :-  जिल्ह्यासह तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजना सुरू केली आहे. समाजातील सर्व सामान्य नागरिकांना वेळेत व दर्जेदार  आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ही योजना सुरु करण्यात आली असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी सांगितले.

  महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थित ऑनलाईप्रणालीव्दारे सांगोला नाका (क्लॉक रुम) यमाई तुकाई मंदिरा जवळ असणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उद्धाटन करण्यात आले.


यावेळी मा.आमदार प्रशांत परिचारक, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, अप्पर तहसिलदार समाधान घुटूकडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे,उपमुख्य अधिकारी सुनील वाळुंजकर, माजी नगरसेवक वामन बंदपट्टे, डी.राज. सर्वगोड,  अनिल सावंत,  सोमनाथ आवताडे, महेश साठे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

या योजनेद्वारे मोफत उपचार, तपासणी आणि औषधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 'आपला दवाखान्यात' बाह्य रुग्णसेवा मोफत औषध उपचार मोफत‌ कार्यशाळा तपासणी, टेली कन्सल्टीशन,  गर्भवती माताची तपासणी ,लसीकरणच्या सेवा देण्यात येणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा, योगा व व्यायामबाबतीचे प्रात्यक्षिक देखील करण्यात येणार आहेत. बाह्यरुग्णसेवेची वेळ दुपारी 2.00 ते रात्री 10.00 पर्यंत असणार आहे.  अल्पावधीत सारडा भवन जवळील क्लॉक रुम व जिल्हा परिषद  शाळा इसबावी आरोग्य वर्धीनी केंद्र येथे हिंदुहृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ कार्यान्वित होणार असल्याचे डॉ. बोधले यांनी सांगितले.

पंढरपूर शहरातील तसेच परिसरातील सर्व सामान्य नागरिकांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजनेततर्गंत  आवश्यक व तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना या सुविधेचा निश्चित लाभ होणार असल्याचे  माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले

 नागरिकांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजनेच्या मोफत आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी यावेळी केले.

यावेळी उपस्थितांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात उपलब्ध सोयी-सुविधांची  पाहणी करुन माहिती घेतली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)