गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसारखे हॉस्पिटल्स राज्यात सर्वत्र व्हावेत - छत्रपती शाहूमहाराज

0
पंढरपूर (प्रतिनिधी) -  येथील श्री. काणे कुटुंबियांच्या तीन पिढ्या उत्कृष्ठ वैद्यकीय सेवा देत आहेत. हा व्यवसाय समाजाला खऱ्या अर्थाने उपयोगी पडणारा आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील श्री छत्रपती शाहू महाराज यांनी, डॉ काणेज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्- घाटन प्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर मा. आ.  प्रशांत परिचारक, डॉ. सुरेंद्र काणे, सौ. डॉ. वर्षा काणे, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, प्रकाश पाटील, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे, वसुधा काणे , माई देगलूरकर,सौ  मुक्तिप्रिया देगलूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना छत्रपती शाहू महाराज म्हणाले, डॉ काणे यांनी चांगली टीम निर्माण केली आहे. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कमी खर्चात उपचार केले जाणार आहेत. आमच्या कोल्हापूर मध्येही एवढे अत्याधुनिक हॉस्पिटल नाही. एकच कुटुंबातील आठ डॉक्टर्स असणारे राज्यातील एकमेव हॉस्पिटल आहे. याच धर्तीवर राज्य शासनाने राज्यात कमी खर्चात उपचार करण्यासाठी हॉस्पिटल्स सुरू करायला हवीत असे ते म्हणाले.
मा. आ. प्रशांत परिचारक म्हणाले, काणे कुटुंबीय हे सुसंस्कारी व प्रगाढ बुध्दीमत्ता असणारे एक आदर्श आहे. रुग्णाची श्रध्दा, विश्वास आपल्या डॉक्टरवर असला पाहिजे, तो विश्वास काणे कुटुंबीयांनी मिळविला आहे. विशिष्ठ तत्व, ध्येय डोळ्यासमोर ठेवून हा व्यवसाय केला पाहिजे. ध्येयाने प्रेरित होऊन काम करणारे हे कुटुंब आहे. दुसऱ्या महायुधदाच्या काळात अत्यंत अडचणीत असलेल्या पंढरपूर अर्बन बँकेला बाहेर काढण्याचे काम भाऊसाहेब काणे यांनी केले होते. अशी जुनी आठवण परिचारक यांनी सांगितली.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले, अशा हॉस्पिटलची गरज पंढरपूर सारख्या भागात आहे, रुग्णाला पुनर्जन्म देण्याचे काम डॉक्टर्स करतात. यावेळी अभिजीत पाटील यांनी अतिशय क्रिटिकल आजार असणाऱ्या एका रुग्णावर विमान रुग्णवाहिकेतून मुंबई येथे उपचार करण्यासाठी केलेल्या परिश्रमाची  माहिती दिली.
प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ पत्रकार श्री. बाळासाहेब बडवे यांनी श्रीविठ्ठलाचे आशीर्वाद तर श्री. क्रांतिसिंह उत्पात यांनी श्रीरुक्मिणी मातेचे आशीर्वाद दिले.   रुग्णालयात उपचार घेऊन  ठणठणीत झालेल्या आठ रुग्णांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी हॉस्पिटलची इमारत बांधलेले अभियंता श्री. कपिल डिंगरे, डॉ. शीतल शहा, डॉ. पंकज गायकवाड, डॉ. विरेंद्र वोहरा, डॉ. एकनाथ बोधले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सौ. वर्षा काणे यांनी केले. यावेळी उपस्थितांचे स्वागत  करण्यासाठी श्रीधर काणे, स्वानंदी काणे, डॉ. श्रीराज काणे, डॉ. शरवाणी काणे, डॉ. सुरेंद्र काणे, डॉ.सौ. वर्षा काणे, डॉ. धनराज काणे, ऋतुराज काणे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. मंदार केसकर, सौ. मैत्रेयी केसकर यांनी केले. आभार डॉ. ऋतुराज काणे यांनी मानले  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी को-ऑर्डिनेटर श्री. विश्वास पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास पंढरपूर शहरातील हजारो लोक उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)