श्रीपांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे १२ मे ला श्रीक्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान

0
पंढरपूर (प्रतिनिधी) - श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व श्रीसंत मुक्ताबाई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्रीपांडुरंगराय  पादुका पालखी सोहळ्याचे शुक्रवार  दि. १२  मे रोजी श्रीक्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान होत असल्याची माहिती श्रीसंत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड.  रवींद्र पाटील यांनी दिली .
श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र मुक्ताईनगर हा परंपरेने सुरु असलेला पालखी सोहळा  श्रीसंत मुक्ताबाई यांच्या ७२६ व्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी  शुक्रवार दि. १२ मे रोजी सकाळी ६ वाजता श्रीक्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवीत आहे . श्रीपांडुरंगराय  पादुकांची सकाळी ६ वाजता विधीवत पुजा झाल्यानंतर  मंदिरे समितीच्या वतीने मानक-यांचा सन्मान होईल व हा सोहळा श्रीक्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवेल.
शुक्रवार दि १२ रोजी सकाळी ९ वाजता करमाळा, दुपारी १ वाजता अहमदनगर, सायंकाळी ४ वाजता नेवासा फाटा  मार्गे सायकाळी ७ वाजता औरंगाबाद येथील श्रीगजानन महाराज मंदिरात मुक्कामी पोहोचेल.
शनिवार  दि .१३ रोजी सकाळी सिल्लोड, दुपारी जामनेर येथे संत नामदेव महाराज पादुका भेट सोहळा, नैवेद्य व भोजन घेवून सायंकाळी कुरापानाचे मार्गे सायंकाळी ५ वाजता श्रीविठ्ठल मंदिर, भुसावळ येथे पोहोचेल. येथे संत निवृत्तीनाथ व श्रीपांडुरंगराय पादुका भेटीचा सोहळा होईल तर पंढरपूरहुन निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या पादुका मुक्ताईनगर मुक्कामी पोहोचतील.
रविवार  दि १४ मे  रोजी श्रीक्षेत्र कोथळी येथे श्रीसंत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा असून या सोहळ्यासाठी श्रीपांडुरंगराय  पादुका पालखी सोहळा पोहोचेल. संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळ्याच्यानिमित्ताने कीर्तनाची सेवा संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. केशवदास नामदास यांची  होईल तर रात्रौ संत निवृत्तीनाथ संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. जयंत महाराज गोसावी यांची कीर्तनाची सेवा होईल.  
सोमवार दि. १५ मे रोजी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र कोथळी ते श्रीक्षेत्र मुक्ताईनगर दिंडी मिरवणुक होईल. त्यानंतर हा सोहळा श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे मुक्कामी विसावेल.
 मंगळवार दि १६ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ द्वादश पारणे सोहळा होईल आणि त्यानंतर श्री पांडुरंगराय  पादुका पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु होईल. मलकापूर, मोताळा , बुलढाणा मार्गे हा सोहळा श्रीक्षेत्र चिखली येथील श्रीरेणुका माता मंदिरात मुक्कामी पोहोचेल. बुधवार दि. १७ मे रोजी देउळगांवराजा, जालना, अंबड, गेवराई मार्गे बीड मुक्कामी पोहोचेल. बीड येथील श्री हनुमान मंदिरात पालखी  सोहळ्याचा मुक्काम आहे.
गुरुवार  दि. १८ मे  रोजी कुंतलगीरी फाटा, वाशी , बार्शी येथील श्रीभगवंत मंदिर, कुर्डुवाडी मार्गे सायंकाळी ६ वाजता हा सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल.
यावेळी पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, सूर्यकांत भिसे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)