पंढरपूर (प्रतिनिधी) -- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि.चंद्रभागानगर, भाळवणीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहिर झाली आहे. अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी १८६ अर्जांची विक्री झाली असून २० उमेदवारांनी २० उमेदवारीचे अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली आहे.
२१ संचालक निवडीसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. कारखान्यासाठी ५ गटातुन मतदान होणार आहे. भाळवणी, भंडीशेगाव, गादेगाव, कासेगाव, सरकोली या पाच गटातून तर उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था प्रतिनिधी, अनुसुचित जाती किंवा जमाती प्रतिनिधी, महिला राखीव प्रतिनिधी इतर मागासवर्ग प्रतिनिधी, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गाचा प्रतिनिधी हे उमेदवार प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडले जाणार आहेत. १६ जून २०२३ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी५ यावेळेत मतदान होणार आहे.
या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी, प्रांताधिकारी कार्यालय येथील सभागृह, पंढरपूर येथे १२ ते १८ मे २०२३ याकालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळणार आहेत. मिळालेल्या नामनिर्देशन पत्राची यादी त्या त्या दिवशी प्रसिध्द करण्यात येणार आहे. उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र २२ मे ते ०५ जून २०२३ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. निवडणूक चिन्हाचे वाटप ०६ जून २०२३ करण्यात येणार आहे. मतदान १६ जून रोजी होणार असून, शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे मतमोजणी आणि निकाल १८ जून २०२३ रोजी घोषित करण्यात येणार आहे.