पंढरपूर (प्रतिनिधी) - शुक्ल यजुर्वेदीय माध्यांदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे यांची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये संस्थेने केलेल्या कार्यामुळे संपूर्ण निवडणूक बिनविरोध झाली. निवडणुक निर्णय अधिकारी श्री. सदानंद महाजन व सहाय्यक अधिकारी श्री. चिंतामणी कुलकर्णी यांनी काल पंढरपूर येथे शुक्ल यजुर्वेदीय माध्यांदिन ब्रह्मवृंद संस्था, श्रीक्षेत्र पंढरपूर येथे निवडणूक बैठकीच्या वेळेस बिनविरोध निवडणूक झाल्याचे जाहीर केले.
-------------------------------------------------
या मध्यवर्ती मंडळामध्ये विलास नारायण देशपांडे -अध्यक्ष, केदार सदाशिव जोशी -उपाध्यक्ष, विश्राम रघुनाथ कुलकर्णी -कार्याध्यक्ष, बाळकृष्ण दत्तात्रय धाराशिवकर -सहकार्याध्यक्ष, श्रीकांत चंद्रकांत जोशी -कार्यवाह, उल्हास रामचंद्र पाठक -सहकार्यवाह, दिलीप सोमनाथ शंभुस -कोषाध्यक्ष, मंगेश रत्नाकर रत्नपारखी -सहकोशाध्यक्ष असे बिनविरोध झालेल्या सर्व नवीन संचालकांची नावे निवडणूक अधिकारी सदानंद महाजन यांनी बैठकीत जाहीर केले.
-------------------------------------------------
या निवडणूक सभेनंतर शिखर संस्था असणाऱ्या मध्यवर्ती मंडळाची सहविचार सभा संपन्न झाली.
या सहविचार सभेच्या सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी यांनी संस्थेने आजवर केलेले कार्य आणि संस्था इथून पुढे कोणकोणत्या गोष्टींमध्ये कार्यरत आहे याबद्दलचा आढावा सांगितला .
शुक्ल यजुर्वेदीय माध्यांदिन ब्रह्मवृंद संस्था, श्रीक्षेत्र पंढरपूर यांचे वतीने सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे मध्यवर्ती मंडळाकडून ज्येष्ठ सभासद श्री. गजानन दादा बिडकर, श्री. मुकुंद वाडेकर या दोघांचा सन्मान करण्यात आला.
मुकुंद वाडेकर यांनी या सत्कारास उत्तर देताना संस्थेचे कार्य कार्यकर्ता म्हणून जर केले तर मनाला आनंद देते आणि अधिक कार्य जोमाने करण्यास उत्साह मिळतो असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात याज्ञवल्क्य स्तवनाने झाली व समारोप सामुदायिक पसायदानाने झाला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संत सोपान मासिकाचे संपादक उन्मेश आटपाडीकर यांनी केले.