पंढरपूर ( प्रतिनिधी ) - पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे होते. या बैठकीत राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकारकडे पत्रव्यवहार करत असून या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकार कडून सोडवले आहेत .
जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना,
राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी,
यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती,
राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता,
प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा,
पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना,
अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे,
पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे,
पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे,
खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी,
पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर विविध विषयावर चर्चा करण्यात आली
पत्रकारांनी एकत्र आल्याशिवाय पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत
- यशवंत पवार
राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण ही बाब पुरोगामी महाराष्ट्र ला शोभणारी नसून लोकशाहीचा चौथा स्तंभ आज अंत्यत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करत असून समाजाचा आरसा म्हणून काम करणाऱ्या प्रामाणिक पत्रकारांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागतं आहे. अश्या बिकट व कठीण परिस्थितीत पत्रकारांनी संघटित असणं काळजी गरज असल्याचे परखड मत पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी पंढरपूर येथील बैठकित व्यक्त केले.
या बैठकीला पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत माळवदे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र शेवडे, पंढरपूर शहर अध्यक्ष दत्ताजी पाटील, तालुका अध्यक्ष तानाजी जाधव सह रामकृष्ण बिडकर, बाहुबली जैन, रफिक आत्तार, दिनेश खंडेलवाल, ज्ञानेश्वर शिंदे, अशोक डोळ, नागेश काळे, चैतन्य उत्पात, राहुल रणदिवे, गणेश दुरुगकर, खानसाहेब मुलाणी, समाधान भोई, जयंत पुराणिक, सिद्धार्थ भडकुंबे इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.