पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांचे हस्ते पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव

0
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान 

       सोलापूर - सध्या सगळीकडे चोऱ्या वाढलेल्या असतानाच तब्बल बारा घरफोड्यांचा तपास करून हे गुन्हे उघडकीस आणून बारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविल्याने सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

      सी.सी.टी.व्ही कॅमेरेचे फुटेज ताब्यात घेवून ते पोलीसांनी चेक केले असता त्यामध्ये दोन मुले वारंवार त्या भागातून  चकरा मारत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तपासाला भक्कम दिशा मिळाली व त्यातून बारा घरफोड्या उघड करण्यात पोलीसांना यश आले. या कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रणजित माने आदींना या कामगिरीबद्दल त्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)