पंढरपूर दि. १ (प्रतिनिधी) - सावरकर प्रेमी मंडळाचे सर्वेसर्वा, सावरकर साहित्याचे गाढे अभ्यासक, मा.नगराध्यक्ष, पंढरपूरचा ज्ञानकोश,संत साहित्याचे अभ्यासक, गुणवंतांचे आश्रयदाते वै. भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचा जन्मदिन सावरकर वाचनालयात साजरा करण्यात आला.
त्यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष श्री. मोहन मंगळवेढेकर यांनी केले. तर त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा श्री.अशोक कुलकर्णी पेशवे यांनी दिला. अत्यंत हृद्य आठवणी त्यांनी सांगितल्या. आपल्या ओघवत्या साभिनय शैलीतील भाषणाने अप्पांचे प्रत्येक पैलूचे दर्शन घडविले. सुमारे ३५ मिनिटात त्यांचे जीवनदर्शन घडविले.
यावेळी अध्यक्ष श्री. मोहन मंगळवेढेकर श्री.शांताराम कुलकर्णी, श्री. भाऊ ताठे, डॉ. मिलिंद जोशी, श्री. हृषिकेश उत्पात, सौ.राधिका उत्पात, श्रीमती ज्योती कुलकर्णी आदी उपस्थित होते.