पंढरपूर ( प्रतिनिधी) - गेल्या कित्येक वर्षापासून आर्थिक संकटात असलेली पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक चेअरमनपद स्वीकारल्यापासून आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न केले. कर्ज वसुली ही सक्तीने केल्यामुळेच कर्ज वसुली शक्य झाली. कारण आपल्या बँकेच्या असंख्य ठेवीदारांनी विश्वासाने आपल्या ठेवी या मर्चंट बँकेत ठेवलेले आहेत. या ठेवीच्या आधारेच कर्ज वाटप केले जाते. कर्ज वसुली करणे हे क्रमप्राप्त आहे. कर्ज वसूल झाले तरच बँक सुरळीतपणे चालत असते. तसेच सभासदांमध्ये ग्राहकांमध्ये त्यामुळे विश्वासहारता ही वाढीस लागलेली आहे. पंढरपूर मर्चंट बँक या बँकेचे कर्ज थकीतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. बँकेचे चेअरमनपद स्वीकारल्यापासून पंढरपूर मर्चंट बँक ही कशी नफ्यात येईल, तसेच कर्मचारी वर्ग वाढवण्याचे धोरण, कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याचे धोरण, बँकेच्या अन्य शाखेचे बांधकाम आधी विकास कामे व कल्याणकारी कामे ही करण्यात आली. सभासदांना लाभांश वाटप रिझर्व बँकेच्या आदेशानुसार दरवर्षी वाटप केले जाते. त्यामुळे सभासद वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जाते. तोट्यात जात असलेली ही पंढरपूर मर्चंट बँक ही नफ्याच्या दिशेने वाटचाल करू लागलेली आहे. काही विरोधकांना कर्ज वसुलीचा त्रास झाल्यामुळे वेगळी चूल त्यांनी आता मांडलेली आहे. बँकेची सभासद मतदार हेसुद्धा जाणकार आहेत. बँकेचे हित कोणते लोक पाहतात याची त्यांना जाणीव आहे.
नागेश भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना पुढे म्हणाले या विरोधकांना आम्ही केलेली सक्तीची कर्ज वसुली हे त्यांना रुचलेली नाही. म्हणूनच वेगळे पॅनल उभा करून ही बँक व्यापाऱ्यांची आहे. राजकारण्यांची नाही असे म्हणू लागले परंतु आमच्या दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक सहकार विकास आघाडी या आघाडीमध्ये जवळपास सर्वच जण हे व्यापारी आहेत. व्यावसायिक आहेत. व्यापाऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला थकीत कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे काम केलेले आहे. विरोधकांच्याकडे कुठलीही विकास व प्रगतीचे कुठलेच धोरणे नाही. आमची बँक, आमची बँक असे म्हणणारे काही महाभाग आपल्याच बँकेला थकीत कर्जाच्या गर्तेत टाकण्याचे काम आणि बँकेला विकासापासून दूर ठेवण्याचा मानस या विरोधकांचा आहे की काय ?असे वाटू लागले आहे. बँकेचे सभासद मतदार हे सुज्ञ व जाणकार आहे बँकेला प्रगतीपथावर नेणाऱ्या पॅनेललाच सभासद विजयी करणार आहे असे नागेश काका भोसले यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.