विठ्ठलच्या तिरंगी लढतीचा हा मोबदला घेण्याचा प्रयत्न

0
दिपक पवार यांनी दिलेल्या पाठिंब्यावर काळे यांची प्रतिक्रिया

पंढरपूर (प्रतिनीधी) - सहकार शिरोमणीची निवडणूक लढविण्याची मानसिक तयारी होती. परंतु आपले बळ पोहचत नाही. ही बाब लक्षात घेऊन केवळ आम्हाला विरोध करण्यासाठी विठ्ठलच्या निवडणुकीत विठ्ठल परिवाराचा एकत्रित मेळ बसू नये यासाठी तिरंगी लढत लावण्याची सुपारी घेतली होती. त्याचाच मोबदला म्हणून दिपक पवार यांनी अभिजीत पाटील यांच्याशी युती केली आहे. असा आरोप समाधान काळे करीत दिपक पवार यांच्यावर टीका केली आहे.
     मागील वर्षी विठ्ठल सह साखर कारखान्याची निवडणूक झाली होती. त्यावेळी विठ्ठल परिवार एकत्रित रहावा यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले होते. त्यावेळी युवराज पाटील आणि गणेशदादा पाटील यांनाही मान्य होऊन माजी चेअरमन भगीरथ भालके यांनीही एक पाऊल मागे घेण्याची भूमिका पार पाडली होती. परंतु या सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी स्वतः ला साथ मिळावी यासाठी दिपक पवार यांनी विठ्ठल परिवाराचा मेळ होऊ दिला नाही. त्यामुळे आमच्या दोन्ही पॅनलचां पराभव झाला. याचेच बक्षीस म्हणून आता अभिजीत पाटील यांचेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ही बाब विठ्ठल परिवारातील सुज्ञ सभासद जाणून आहेत. असेही काळे यांनी सांगितले आहे.
   सध्या विरोधक  सभासद नसलेल्या लोकांना बैठकीसाठी बोलाऊन गर्दी करत आहेत. शंभर सभासद नसलेल्या गावातून हजारो लोकांची गर्दी करून चुकीचा प्रचार दाखविण्याचा केविलवाणा प्रकार पहावयास मिळत आहेत. यासाठी हा आमचा सहकार शिरोमणीचा सभासद भुलनार नाही. असेही काळे यांनी सांगितले आहे.
आजवर काळे गटावर नको ते आरोप करून आमचं खाचिकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु स्व. वसंतदादा काळे यांच्यापासून आमच्या कुटुंबावर निष्ठा असलेले कार्यकर्ते आजवर आमच्यावर कायम प्रेम करीत आहेत.यामुळे कोण कुठे गेले. तरी याचा मतदार सभासद विचार करत बसणार नाहीत. असेही ठोसपणे समाधान काळे यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)