पंढरपूर मर्चन्ट बँकेसाठी उद्या मतदान

0
१५ ठिकाणी होणार मतदान, एकूण सभासद १०३८५

पंढरपूर - (प्रतिनिधी) - येथील दि पंढरपूर मर्चन्टस को. ऑप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी उद्या रविवार दिनांक १४ मे रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान होणार आहे.
     या निवडणूकीसाठी मतदानाकरीता मतदान केंद्रे निश्चीत करण्यात आली असून पंढरपूरात १५ ठिकाणी तसेच करकंब, कुर्डुवाडी, टेंभूर्णी व महुद येथील मतदान केंद्रावर मतदान करता येणार आहे. एकूण १०,३८५ सभासद मतदार आहेत. या निवडणूकीची मतमोजणी १५ मे रोजी पंढरपूरात होणार असून मतमोजणी नंतर लगेच निकाल जाहिर होणार आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)