कल्याणराव काळे यांनी दाखविले सभासदांचे पाठबळ
पंढरपूर (प्रतिनीधी) - पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली आहे. यामध्ये विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांच्या काही समर्थक यांनी मागील काही दिवसात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अशातच मंगळवारी स्वतः कल्याणराव काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मंगळवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य रॅलीने सुरुवात केली. यामध्ये हजारो सभासद यांनी आमचा पाठिंबा विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांना असल्याचे अगदी स्पष्टपणे दाखऊन दिले.
या सुरू असलेल्या सहकार शिरोमणीच्या निवडणुकीसाठी विद्यमान चेअरमन कल्याण काळे यांनी मोठ शक्ती प्रदर्शनात केला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अजूनही सभासद मोठ्या संख्येने काळे यांच्या पाठीशी दिसून आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथे काळे यांनी हजारो समर्थकांसह शक्ती प्रदर्शन दाखवत शिवतीर्थ पासून महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मोटरसायकल रॅली काढून प्रांत कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी हजारो काळे समर्थक मोटारसायकल रॅलीत सहभागी झाल्याचे दिसून आले.
आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काळे म्हणाले की पूर्ण ताकतीनिशी आम्ही सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन निवडणुकीत उतरलो असून, बोटावर मोजण्याइतके काही विरोधक बिनबुडाचे आरोप करीत आहेत.या विरोध करणाऱ्या विरोधकांना आता कायमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही सर्वजण मिळून स्वस्त बसणार नाही .तसेच शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी स्वतःची व सहकारी संचालकांचे प्रॉपर्टी घाण ठेवून ऊस बिल वाटप साठी पैसे उपलब्ध केले आहेत ऊस बिल वाटप सर्व शेतकऱ्यांचे हे पूर्ण केले जाणार आहे .
सर्व विठ्ठल परिवारातील सहकारी असलेले भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील व सर्व विठ्ठल सहकारी व शेतकरी या निवडणुकीत विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील. यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके म्हणाले की, खरा विठ्ठल परिवार कोण आहे ते सभासद या निवडणुकीत दाखवतील. यावेळी सहकार शिरोमणीचे संचालक व काळे यांचे हजारो समर्थक उपस्थित होते.
विरोधकासाठी जागा नाहीच !
सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखाना निवडणूक लढविण्यासाठी आम्ही आता जय्यत तयारी ठेवली आहे. मात्र विरोधकांनी नुसती गलगल सुरू केली आहे. मात्र आम्ही स्वतः च्या संपत्ती गहाण ठेऊन सर्व देणी देण्यासाठी सोय केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत काही जागावाटप वगैरे असला प्रकार नसणार आहे. एवढा सभासद वर्ग माझ्या सोबत दिसत असताना त्यांना एकही जागा त्यांना देणार नसल्याची स्पष्ट प्रतिक्रिया चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिली आहे. यामुळे विरोधक यांच्याशी चर्चा करण्याचा आता प्रश्न उरला नसल्याचे दिसून आले आहे.