पुणे (प्रतिनिधी) - शुक्ल यजुर्वेदीय महाराष्ट्रीयन ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ, याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (YUVA), याज्ञवल्क्य सहकारी पतसंस्था व केंघे ब्राह्मण वसतिगृह ह्यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न होत आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती २८ मे २०२३ रोजी सकाळी ९ वाजता ५५५ नारायण पेठ, येथे आयोजित केली आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त मा. श्री. शिरीष श्रीधर आपटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या व्याख्यानमालेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मध्यवर्ती मंडळाचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी यांनी केले आहे.