विचार परिवर्तनाचा मतदार संघाच्या प्रगतीचा विकासाचा...

0
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचा कायापालट करण्याचा मानस उराशी बाळगत पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील देखणा कायापालट करण्यासाठी आपल्या मतदारसंघात अल्पावधी काळातच झेप भरारी घेत आमदार समाधानदादा आवताडे यांनी विकासाकडे वाटचाल सुरू केली..

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. समाधानदादा आवताडे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या बिस्किटे वस्ती (उत्तम कांबळे घर ते भोंगाळे वस्ती रस्ता) मुरमीकरण व खडीकरण करणे तसेच २) दलीत वस्ती येथे राऊत गल्ली खिलारे वस्ती येथे फेवर ब्लॉक बसवणे  या विकास कामाचे भूमिपूजन कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती मा. सोमनाथ जी आवताडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
मुंढेवाडी नगरीतील जनतेने आपुलकीच्या भावनेने केलेल्या आदरातिथ्याने मान्यवर मंडळी भारावून गेली. 

यावेळी बोलताना सभापती महोदय यांनी सांगितले की, पंढरपूर व मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार मा. दादासाहेब यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज अशा मुलभुत सुविधांच्या पूर्ततेसाठी आपले नेतृत्व पणास लावले आहे. आमदार मा. दादासाहेब यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये आशीर्वाद आणि पाठींबा यांची रसद मुंढेवाडी नगरीतील माय - बाप जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि यापुढील काळात देखील रस्ते व इतर सेवासुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार महोदय कटिबद्ध आहेत, असे सभापती महोदय यांनी अश्वासित केले.
या कार्यक्रमासाठी मा.सरपंच संतोष मोरे, मा. सरपंच ज्ञानेश्वर घाडगे, मा. अध्यक्ष तंटामुक्त बाळासाहेब शिंदे, ज्येष्ठ नेते भारत भाऊ मोरे, उपसरपंच अभिमान मोरे, मा.सदस्य दादासाहेब मोरे, ग्रा. स.फरीद मुजावर, मा.उप. आतिक मुलाणी, युवा नेते अध्यक्ष अभयसिंह मोरे, तंटामुक्त अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली मोरे, ज्येष्ठ नेते नागेश बापू मोरे, अध्यक्ष बाबासाहेब पाटील, दत्तात्रय मोरे, विजय बिस्किटे, सदस्य हनुमंत नवले, मुसा मुजावर, अर्जुन शिंदे, लक्ष्मण मोरे, मा. सदस्य आप्पा मोरे टेलर, कुलदीप मोरे,  ग्रामपंचायत सदस्य नागेश जाधव, मा. ग्रा. स. हनुमंत नवले, बंडू  मोरे, युवा नेते विजय मोरे, सतीश मोरे, मा. ग्रा.स.ज्ञानेश्वर खिलारे, मनोज मोरे चेअरमन, ग्रा. प. स. अभिजीत मोरे,श्री. अविनाश मोरे सर  आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)