क्रेडाई पंढरपूर संघटनेचा पदग्रहण कार्यक्रम संपन्न

0
 
पंढरपूर (प्रतिनिधी)  - क्रेडाई पंढरपूर संघटनेचा पदग्रहणचा कार्यक्रम मा आमदार श्री प्रशांत  परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली तर क्रेडाई संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री प्रमोदजी खैरनार, क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.सुनीलजी फुरडे, युटोपीयन शुगरचे चेअरमन श्री उमेश  परिचारक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत आबा पाटील, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव श्री.विद्यानंदजी बेडेकर व सहसचिव श्री रवींद्र खिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. 
           पंढरपूर क्रेडाईच्या २०२३-२०२५ च्या अध्यक्षपदी श्री अमित शिरगांवकर, सचिव श्री मिलींद देशपांडे, खजिनदार श्री संतोष कचरे , उपाध्यक्ष श्री आशिष शहा, सहसचिव श्री.शशिकांत सुतार तर जनसंपर्क अधिकारी श्री विवेक परदेशी या नुतन टीम चे पदग्रहण संपन्न झाले. श्री मिलिंद वाघ व श्री संजय हंकारे यांची संचालक पदी नियुक्ती करण्यात आली तर कु. अंकित फत्तेपुरकर व कु. क्षितिज शहा यांची क्रेडाई युथ विंग प्रमुख पदी तर सौ ऋतुजा शहा यांची क्रेडाई वूमन विंग कोर्डिनेटर पदी व  उप को-ऑर्डिनेटर पदी सौ. सिमा नलबिलवार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. सौ सिमाताई परिचारक व मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व नूतन पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले.
         क्रेडाई संघटनेचे नूतन सदस्य कु. ऋषीकेश उमेश  परिचारक,श्री. अजित कंडरे, श्री. महेश आराध्ये,श्री.अमोल नागटिळक यांचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून क्रेडाई पंढरपूर परिवारामध्ये स्वागत करण्यात आले तसेच क्रेडाई युथ विंगचे यश देशपांडे, कार्तिकेय कंडरे, परिमल जाधव, शाश्वत सांगोलकर, सृष्टी देशपांडे व श्रुती सुतार यांचेही स्वागत करण्यात आले.
           क्रेडाई ही बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय पातळीवरील शिखर संस्था असून तिच्या महाराष्ट्रात साठ शाखा आहेत व चार हजार सदस्य आहेत. क्रेडाई सदस्य असणे हि एक मानाची बाब असुन, सदस्यत्व प्राप्त झाल्यानंतर क्रेडाईचे विशेष कोड ऑफ कंडक्ट असुन त्याप्रमाणे अधिकार व जबाबदारीही असतात.  सर्व सदस्यांना याचे पालन करणे बंधनकारक असते. बांधकाम क्षेत्रामध्ये कोणतेही बदल घडवताना, नियम बनवताना शासनाच्या वतीने क्रेडाई संघटनेचे मत घेतले जाते, चर्चा केली जाते. शासनाच्या विविध टीम मध्ये क्रेडाई संघटनेच्या सदस्याची ही नेमणूक करण्यात येते.  क्रेडाई संघटनेला बांधकाम व्यवसायिक व ग्राहक यामधील दुवा मानला जातो. ग्राहकांची कोणतीही अडचण किंवा तक्रार असल्यास ती न्याय्य पद्धतीने क्रेडाई मार्फत सोडवली जाते. शासकीय नियमानुसार रेरा कडे प्रकल्प नोंदणीकृत करण्यासाठी क्रेडाई सदस्य असणे बंधनकारक आहे.
          क्रेडाई संघटनेचे अध्यक्षपद ही एक मोठी जबाबदारी असून  श्री अमित शिरगावकर व नुतन पदाधिकारी हे सदर जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील अशी खात्री असल्याचे महाराष्ट्र क्रेडाई अध्यक्ष प्रमोदजी खैरनार साहेब यांनी सांगितले तर  मागील टीम चे प्रेसिडेंट श्री. मुकुंद कर्वे यांनी महाराष्ट्र क्रेडाई कोअर टीम मध्ये व पंढरपूर मध्येही खूप चांगल्या प्रकारे काम केले असल्याचे क्रेडाई महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आवर्जुन सांगितले व पास्ट प्रेसिडेंट मुकुंद कर्वे यांच्या कार्याचा गौरव केला.
           कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आमदार प्रशांतराव परिचारक यांनी नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या व क्रेडाई संघटना खूप चांगले काम करत असून पंढरपूरच्या विकासासाठी, विविध प्रश्नावर क्रेडाई पंढरपूरने प्रेझेंटेशन करावे व विविध मार्ग सुचवावेत असे सांगितले व क्रेडाई संघटनेच्या मदतीला आम्ही सदैव तत्पर असु असे सांगितले तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी नूतन टीमला शुभेच्छा दिल्या व पंढरपूर मधील नागरिकांना घर मिळवण्यासाठी उत्तम दर्जाचे घर रिझनेबल दरात नागरिकांना मिळवून द्यावी अशी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने अपेक्षा व्यक्त केली. 
           कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मुकुंद कर्वे यांनी केले तर स्वागत माजी अध्यक्ष तुकाराम राऊत यांनी केले,आर.बी. जाधव यांनी संपूर्ण कार्यकारणी जाहीर केली व कार्यक्रमाचे आभार आशिष शहा यांनी मांनले तर सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रमोद कचरे, सचिन पंढरपूरकर, शार्दुल नलबीलवार, महेश सांगोलकर, बालाजी गडम, आर.डी.देशपांडे, शरद कुलकर्णी, माऊली लाड, संजय हंकारे, संजय भाळवणकर, आर.डी.मस्के, अर्जुन बसेटवार,अंकित फत्तेपूरकर यांनी परिक्षम घेतले.
         सदर कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास, विनय उपाध्ये, दिपक इरकल, लायन्स क्लब झोन चेअरमन राजीव कटेकर, सचिवा डॉ अश्विनी परदेशी, इनरविल संस्थेचे माजी गव्हर्नर नगीना बोहरी, अध्यक्ष वैशाली काशीद, माजी नगरसेवक नारायण सिंघण,नवनाथ रानगट, गणेश सिंगण व लायन्स वुमन विंग चे सर्व सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)