ज्येष्ठ कायदे तज्ञ उज्वल निकम यांचा पंढरीत सन्मान

0
पंढरपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईच्या ट्रस्टीपदी ज्येष्ठ कायदे। तज्ञ अॅड. उज्वल निकम यांची निवड झाल्याबद्दल शनिवार, १३ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता पंढरपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या गौतम विद्यालय येथे येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सहसचिव प्रा. यु. एम मस्के, संस्थेचे कार्यकारी सदस्य चंद्रशेखर कांबळे, सुनील सर्वगोड उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईच्या ट्रस्टीपदी ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. उज्वल निकम यांची निवड संस्थेचे चेअरमन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.यानंतर ते प्रथमच पंढरपूर येथील पीपल्स एज्युकेशनसोसायटी संचलित गौतम विद्यालय व संत गाडगे महाराज चोखामेळा विद्यार्थी वस्तीगृह पंढरपूर येथे येत असल्याने त्यांचा येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)