पंढरपूर शहरात मटका व अवैद्य व्यावसाईकांना नेमका आशीर्वाद कोणाचा?

0
पंढरपूर (प्रतिनिधी) - शहरात सध्या मटका व्यवसायाची जोरदार रेलचेल सुरू झाली आहे. शहराच्या विविध भागात मटका व्यावसाईकांनी आपले बस्तान मांडले आहे. या अवैध व्यवसायाला नेमके पाठबळ कुणाचे असा प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. मटका व्यावसायीकांवर कुणा कुणाचा वरदहस्त आहे. ज्यामुळे मटका व्यावसायिकः राजरोसपणे मटका सुरू ठेवत आहेत. त्यामुळे या मटका व्यावसायिकांवर कुणाचा हात आहे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. पंढरपूरात मटक्याचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात तेजीत आला आहे. 

पंढरपूर मध्ये कुणालाही विचारा की मटका कुठे चालतो ? असं विचारल्यावर कुणीही राजरोसपणे सांगताना दिसतो. मग अशा व्यवसायाचा पत्ता पोलिसांना का माहित.होत नाही असे अनेक ठिकाणी बोलले जाते.

यापूर्वी मटका बुकी सांभाळणारे किंवा खेळ लिहिणारे (मटका लिहून घेणारे) यांनाही मटका मालक होण्याची स्वप्न पडू लागली आहेत. मटक्यावाल्यांनी नविन पध्दतीने मटक्याची घरपोच सुविधा आपल्या ग्राहकांना पुरवली जात आहे. मटक्याचे नंबर लागले की लगेच फोन पे, गुगल पे, पेटियम पे द्वारे पैसे देण्यात येते. घेण्यासाठी कस्टमर या मटकावाल्यांच्या रात्री बेरात्री घरी चकरा मारतात. सध्या  मिलन डे,मिलन नाईट, टाईम बजार,मेन मुंबई, कल्याण मटका असे अनेक प्रकार दिसून येत आहे. 
दरम्यान या व्यवसायात अनेक कार्यकर्ते दिसतात. परंतु लोकप्रतिनिधी मात्र तो माझा कार्यकर्ता नव्हेच अशा भूमिकेत असल्याचे चित्र दिसत आहे. अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन पाउल चालत नाही-मटका व्यावसायिकांना उचलले तर राजकीय दडपण त्यांच्यावर येतय आणि येथेच अवैध व्यवसायाला खतपाणी मिळतय का? असं देखील अनेकदा समोर आलं आहे.

या व्यवसायामुळे तरुण, काबाडकस्ट न करता झटपट श्रीमंत होण्याच्या स्वप्नात वावरताना दिसतात.

या वर्षे भरापासून एकाही मटका किंगवर अद्याप कारवाई झालेली नाही. स्वताला हुकूमी एक्का म्हणवणारे या मटका व्यावसायिकांना राजकीय पाठबळ तर मिळत नाही ना?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बड्या माशांवर कारवाई होताना दिसत नाही. असा आरोप जनतेतून होताना दिसत आहे. 

सोबतच अवैध शिंदी आणताना व देशी दारू जाताना दिसत आहे. परंतू त्याकडेही पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे.

शहरात राजरोसपणे मटक्यासारखे अवैध धंदे चालत असताना त्यांना बळ कोण देतं? हा प्रश्न सर्वांना पडतो. मात्र शहरात अवैध व्यवसायाला पाठबळ देण्यासाठी मटका व्यावसायिकांनी राजकीय आश्रय घेतला असल्याची चर्चा सध्या पंढरपूर शहरात जोरात सुरू आहे. एक मटका किंग तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या दिमतीला असल्याचे बोललं जात आहे.

एकूणच पंढरपूर शहरातील अवैध मटका, शिंदी, दारू व्यवसाय स्थानिक आमदार खासदारांचे पाठबळ तर नाहीत ना? यातील काही मटका किंग तर सत्ताधारी व इतर पदाधिकार्यांसोबत फिरतांना दिसतात या प्रकाराने अवैध धंदे करणार्यावर कायद्याचा बडगा उचलला जाणार का या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)