श्रीकालिकादेवी मंदिरात गंगा-दशहरा उत्सव

0
श्रीक्षेत्र पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाच्या वतीने श्रीकालिकादेवी मंदिरात गंगा-दशहरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आसतो. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला भगिरथाच्या प्रयत्नाने पृथ्वीवर आलेल्या गंगेचे अवतरण झाले असे म्हणतात. प्रतिपदेपासून हळूहळू दशमीपर्यंत गंगेचा हा प्रवाह पूर्णपणे पृथ्वीवर अवतरला होता त्यामुळे या दहा दिवसांत तिचे  भजन, पूजन या गोष्टींना महत्त्व आहे, या दिवसापासून ज्येष्ठ शुद्ध दशमी पर्यंत ही दशहारा पर्वणी साजरी केली जाते.
यानिमित्ताने दररोज दोन यजमानांच्या हस्ते श्रीकालिकामातेस पंचामृत अभिषेक, महापूजा श्री वेदांत शास्त्री वांगीकर यांच्या पौराहित्याखाली संपन्न होत असुन दररोज दुपारी ब्राह्मण भोजन व समाज बांधवांन प्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती महेश महाराज भिवरे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी राजेंद्र अचलारे, संतोष काटकर, राजाभाऊ तिवाटणे, संतोष सासवडे, यांच्यासह आनेक समाज बांधव व समाजाचे कार्यकारी मंडळ, युवक मंडळ व महिला मंडळ परिश्रम घेत कासार समाज अजुनही जुन्या परंपरा जपत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)