विठ्ठल साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन देशाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी)-- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे ते २०२४ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतची चर्चा रंगली होती.
विठ्ठल साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन देशाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, बबनराव शिंदे, संदीप क्षिरसागर,संजय पाटील,कैलास पाटील,रवींद्र धंगेकर,माजी आमदार राजन पाटील,दिपक साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,महेश कोठे यांच्यासह पक्षाचे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.
अभिजित पाटील यांच्या प्रवेशामुळे पंढरपुर शहर व तालुक्यात राष्ट्रवादीला आणखी बळकटी मिळाली असून. युवा कार्यकर्ते मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. भविष्यात पंढरपुरात भाजप विरोधात राष्ट्रवादीकडून अभिजित पाटील असा सामना पहायला मिळू शकतो.
अभिजित पाटील यांनी वेणूनगर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मातब्बरांना मात देवून विजय खेचून आणला. अभिजित पाटील हे शेतकरी ,सभासद ,ऊस उत्पादक शेतकरी, कामगार तसेच सामान्य माणसाला भावणारे व्यक्तीमत्व आहे हे सिद्ध झाले आहे. साखर कारखाना क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कार्याची दखल राज्य व देशपातळीवर नावलौकिक मिळविला आहे राज्यातील बंद असलेली तब्बल ५ साखर कारखाने अभिजित पाटील हे चालवित आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांबरोबरच त्यांचा भाजपशीही दोस्ताना होता, त्यामुळे अभिजित पाटील नेमके कुणाचे, असा प्रश्न विचारला जात होता, त्याला आज उत्तर मिळाले आहे.अभिजीत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढ्या मधून आगामी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी अशी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती. देशाचे नेते शरद पवार यांच्याशी त्यांचे असलेले दृढ संबंध यामुळे पंढरपूर विधानसभा मतदार संघातून अभिजित पाटील यांना उमेदवारी मिळेल अशी आशा कार्यकर्त्यांना आहे. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन उमेदवारी निश्चित करुन घेत अभिजित पाटील गटाने आज अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
साखर कारखाना चालवणारा माणूस म्हणून अभिजीत आबा पाटलांची राज्यात व देशात ओळख निर्माण झाली आहे शेतकऱ्यांना आपला हक्काचा माणूस म्हणून अभिजीत पाटलांची ओळख आहे.