पंढरपूर मर्चंट बँक सहकारी विकास आघाडीचा दणदणीत विजय

0

       पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. यामध्ये नागेश भोसले प्रणित पंढरपूर मर्चंट बँक सहकारी विकास आघाडी  पॅनलने १५ पैकी १२ जागांवर विजय मिळवला असून विरोधी पॅनलला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले. 

भोसले प्रणित पंढरपूर मर्चंट बँक सहकारी विकास आघाडी – भगीरथ औदुंबर म्हमाणे , राजेंद्र पवनलाल फडे , विजयकुमार रामचंद्र परदेशी,  अमरजित राजाराम पाटील, नागेश अण्णासो भोसले, पांडुरंग निवृत्ती शिंदे -नाईक, शितील विद्याधर तंबोले, सोमानाथ सदाशिव डोंबे, विजयकुमार कांतीलाल कोठारी, मंजुश्री सुधीर भोसले, अदित्य चंद्रकलेश्वर फत्तेपूरकर, वसंत धोंडीबा शिखरे (बिनविरोध) हे उमेदवार विजयी झाले तर  विरोधी पॅनल मधील - भारत शिवदास भिंगे, सुनंदा पदम्कुमार गांधी, संजय विठल जवंजाळ हे उमेदवार विजयी झाले.

 भोसले  प्रणित पॅनलने १२ जागांवर विजयश्री खेचून आणल्यानंतर भोसले पॅनल समर्थकांनी गुलालाची मुक्त उधळण करीत मोठा जल्लोष साजरा केला. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)