पंढरपूर (प्रतिनिधी) - अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती पंढरपूर शाखेच्या वतीने ग्राहक कायद्याचे जनक बिंदू माधव जोशी यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त नगर वाचन मंदिर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमित शिरगावकर क्रेडाई अध्यक्ष, पंढरपूर हे होते तर प्रमुख उपस्थितीत सुभाष सरदेशमुख सर प्रांत सदस्य, विनोद भरते सर प्रांत कोषाध्यक्ष,
शशिकांत हरिदास जिल्हा अध्यक्ष,
दीपक इरकल सर जिल्हा संघटक, सुहास निकते जिल्हा सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला.
त्याप्रसंगी संघटना ही ग्राहकांसाठी ग्राहकाच्या हक्कासाठी काम करत असून सामाजिक कार्यातील त्यांचे योगदान मोठे असून ग्राहक संघटनेचे कुठलेही सामाजिक काम असल्यास क्रेडाई अर्थात बांधकाम व्यावसायिक संघटना सर्वतोपरी सहकार्य करेल असे प्रतिपादन क्रेडाई संस्थेचे अध्यक्ष अमित शिरगावकर यांनी केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक स्वातंत्र्य सेनानी बिंदू माधव जोशी तथा नाना यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने नगर वाचन मंदिराच्या सभागृहात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवर व्यक्तींचा सत्कार करण्यात आले. यामध्ये व्यंगचित्रकार श्याम सावजी , मिलिंद बडवे, पत्रकार लखन साळुंखे, पत्रकार प्रशांत माळवदे, राजकुमार आवताडे, विष्णू आराध्ये यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये, तालुका संघटक महेश भोसले , तालुका सचिव प्रा. धनंजय पंधे व ग्राहक पंचायत समितीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार देशपांडे यांनी केले. आभार प्रदर्शन होऊन अल्पोपहाराणे कार्यक्रमाची सांगता झाली.