पंढरपूर (प्रतिनिधी ) - पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण २१ जागेकरिता निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली.
नामनिर्देशन दाखल करण्याचे ठिकाण पंढरपूर येथील प्रांत अधिकारी यांचे कार्यालय येथे दिनांक १२/५ /२०२३ ते १८/५२०२३ रोजी उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ११ ते ३ या वेळेत दाखल करणे, दिनांक १९ /५/२०२३ रोजी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात येईल तसेच दि. २३ / ५ /२०२३ ते ६/६/२०२३ रोजी उमेदवारांनी अर्ज ११ ते ३ या वेळेत माघारी घेण्यात येईल, दि. ७/६ / २०२३ रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्हाचे वाटप सकाळी ११ वाजता करण्यात येईल. त्यानंतर १६/६/२०२३ रोजी सकाळी ८ ते सायं. ५ या वेळेत मतदान घेण्यात येऊन दिनांक १८/६/२०२३ रोजी येथील शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे निकाल जाहीर करण्यात येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले.