पंढरपूर (प्रतिनिधी) --- कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी हरिश गायकवाड व उपसभापतीपदी राजू गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बाजार निवडणूकीत मा. आ. प्रशांत परिचारक यांचे पॅनल विजयी झाले. या नंतर सभापतीपदी म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे शेतकरी, व्यापाऱ्यांचे लक्ष लागले होते. बैठकीत सभापतीपदासाठी हरिश गायकवाड, दिनकर चव्हाण, राजू गावडे नावाची चर्चा झाली. मात्र अंतिम निर्णय घेण्याचे अधिकारी परिचारक यांना देण्यात आला होता. सभापती व उपसभापती निवड करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी सावे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सभापती पदासाठी हरिष गायकवाड व उपसभापती पदासाठी राज गावडे यांचे एक एक अर्ज दाखल झाले. म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी सावे यांनी दोघांची बिनविरोध निवड केली असल्याचे जाहिर केले. यावेळी युटोपियन कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, वामन माने, सुभाष माने आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
नूतन सभापती व उपसभापतीची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्याची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला.